नगरमधील अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, गंभीर स्थितीत सरकारी आदेश मोडल्याचा आरोप

नगरमधील अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, गंभीर स्थितीत सरकारी आदेश मोडल्याचा आरोप

राज्यातील परिस्थितीचं प्रशासनातील अधिकाऱ्यांना गांभीर्य आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 15 एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदीसह संचारबंदी लागू केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाला प्रशासनातील अधिकारी धाब्यावर बसवत असल्याचं दिसत आहे. कारण पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आपत्ती व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यत्र्यांचा आदेश झुगारून नाशिकची वारी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कोरोनामुळे जिल्हा बंदीचे आदेश असताना जिल्ह्याच्या सीमा बंद करून बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना रोखण्याचे मोठे आव्हान आहे.  मात्र तहसीलदार आपले हेडक्वॉर्टर सोडून नाशिकला गेल्या, अशी तक्रार मुख्यमंऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थितीचं प्रशासनातील अधिकाऱ्यांना गांभीर्य आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तहसीलदारांना फेटाळला दावा

28 मार्चला पारनेरमध्येच आपण असल्याचा दावा तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला आहे. मात्र  टोलनाक्यांच्या कॅमेऱ्यात ज्योती देवरे यांचे शासकीय वाहन दिसले आहे. पारनेरहून नाशिककडे गेलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांचे सरकारी वाहन संगमनेर आणि सिन्नर येथील टोलनाक्यांच्या सीसी टीव्हीमध्ये जाताना आणि येताना दिसले आहे.

आणीबाणीच्या स्थितीमध्ये देवरे यांना नाशिकला जाण्याची परवानगी कोणी दिल ? नाशिकला जाताना शासकीय वाहन घेवून जाता येते का? असे प्रश्‍न आता निर्माण झाले आहेत. जर स्वत: तहसीलदार जिल्ह्याबाहेर गेल्या नाहीत तर मग त्यांचे वाहन कोणी वापरले, याचीही चौकशी करण्याची गरज आहे, अशी मागणी आता समोर येत आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 15, 2020, 9:38 AM IST

ताज्या बातम्या