लॉकडाऊनसाठी नवी नियमावली जाहीर; 'या' सेवांना दिल्या सवलती, तर ट्रेन बंदच राहणार

लॉकडाऊनसाठी नवी नियमावली जाहीर; 'या' सेवांना दिल्या सवलती, तर ट्रेन बंदच राहणार

हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी केली. यासाठी आज गृहमंत्रालयाने नियमावली (Guideline) जाहीर केली आहेत. यात शेती आणि विशिष्ट उद्योगांसाठी ग्रामीण भागांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर, हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच, यामध्ये 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये कसे नियम असतील याबबात सूचना देण्यात आल्या आहेत.

गृहमंत्रालयाच्या वतीने 20 एप्रिलनंतर हॉटस्पॉट आणि सील केलेल्या भागांसाठी एक वेगळी नियमावली असणार आहे. नव्या नियमावलीमध्ये देण्या आलेल्या सवलती या हॉटस्पॉट आणि सील प्रदेशांना लागू होणार नाहीत. हे हॉटस्पॉट्स फक्त आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांद्वारेच राहतील.

या सेवांना सवलती

या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णालये, किराणा दुकान, शेती, ऑनलाईन टीचिंग, मासेमारी या सर्वांना सवलती देण्यात आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्प किंवा नूतनीकरणयोग्य उर्जाशी जोडलेल्या ग्रामीण भागात बांधकाम उपक्रमांना सूट देण्यात आली आहे, मजुरीची उपलब्धता असल्यास स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने मुख्य भागात बांधकामांना परवानगी आहे.

या सेवा बंदच राहणार

हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर मॉल्स, जीम, जलतरण तलाव, बार, हॉटेल्स 3 मेपर्यंत बंद राहणार आहेत. मुख्य म्हणजे हॉटस्पॉट आणि सील केलेल्या भागांसाठी नवीन नियमावली असेल. ही नियमावली 20 एप्रिलनंतर जारी करण्यात येणार आहे.

20 एप्रिलनंतर 'या' भागात शिथिल होणार नियम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याचवेळी देशातील काही भागात 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. '20 एप्रिलनंतर ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी असेल तिथे काही जीवनावश्यक सेवांसाठी शिथिलता आणली जाईल. मात्र त्यालाही काही नियम व अटी असतील,' अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. 'आजपासून 20 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत. सर्व गाव, तालुका, जिल्हे यांचं मुल्यांकन करणार...त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी किती काळजी घेतली हे तापसलं जाणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी असणाऱ्या भागात 20 एप्रिलपासून शिथिलता आणण्याचा निर्णय गरिबांकडे बघून घेण्यात आला,' असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

First published: April 15, 2020, 9:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading