नवी दिल्ली / रिओ, 15 एप्रिल : कोरोनाने जगभरात हाहाकार माजला आहे. उन्हाळ्यात किंवा उष्मा वाढल्यानंतर कोरोना कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र हे दावे फोल ठरल्याचे दिसत आहे. एप्रिलचा निम्मा कालावधी उलटला असला तरी जगभरात कोरोनाबाधिक रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात गरम प्रदेशातील देशांमध्येही कोरोना तेवढ्याच झपाट्याने वाढताना दिसत आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास या दाव्याच्या उलट कोरोना असल्याचे दिसत आहे. जिथे थंड देशांमध्ये विषाणूचा प्रसार होण्यास 90 दिवस लागले, तर भारत, ब्राझील आणि मध्य पूर्व यांसारख्या गरम देशांमध्ये कोरोना दुपटीपे पसरत आहे. मागील 12 दिवस सर्वात उष्ण मानल्या जाणाऱ्या दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणखी झपाट्याने झाला आहे. वाचा- लॉकडाऊनसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ सेवांना दिल्या सवलती, तर ट्रेन बंदच राहणार भारतातच नाही तर दक्षिणपूर्व आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेतही उन्हाळ्याता सुरुवात झाली आहे. या सर्व देशांमध्ये दिवसाचे सरासरी तापमान आता 20 ते 40 डिग्री आहे. भारतातही गेल्या 12 दिवसात सरासरी तापमान 32 अंशांवर तर ब्राझीलमध्ये ते 26च्या आसपास आहे. भारतात, जिथे या दिवसात 7800 पेक्षा जास्त केसेस नोंदल्या गेल्या आहेत, तेथे ब्राझीलमध्ये 16 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे आढळली आहेत. वाचा- देशभरात आतापर्यंत 11 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग तर 377 रुणांचा मृत्यू ब्राझील आणि इक्वेडोर बनले हॉटस्पॉट गेल्या 15 दिवसांपासून सरासरी तापमान 26 डिग्री असूनही ब्राझीलमध्ये कोरोनाची प्रकरणे 25 हजार 262 पर्यंत वाढली. यामुळे 1832 लोकांचा मृत्यूदेखील झाला आहे. त्याचप्रमाणे इक्वेडोर या छोट्या देशातही कोरोना वेगाने पसरला आहे. या देशात सरासरी तापमान 19 अंशांच्या आसपास आहे. या देशात 7257 प्रकरणे होती आणि त्यात 315 हून अधिक मृत्यू आहेत. लॅटिन अमेरिकन आणि दक्षिण अमेरिकन इतर देशांमध्ये तापमान 33 अंशांवर पोहोचले आहे, परंतु कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. वाचा- ‘या’ कारणामुळे मुंबईत जीवघेणा ठरतोय कोरोना, तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता मध्य पूर्व-दक्षिण आशियामध्ये प्रकरणात सतत वाढ मध्य पूर्व देश उष्णतेसाठी प्रसिद्ध आहेत. इस्त्राइल, तुर्की, सौदी अरेबिया आणि युएईमध्ये तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचू लागले आहे. मात्र या भागातही कोरोनाचा प्रसार थांबला नाही आहे. इस्रायलमध्ये कोरोना संसर्गाची 12 हजार 046 प्रकरणे समोर आली आहेत. तर, 450पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये इंडोनेशिया, भारत आणि बांगलादेशची प्रकरणे जवळजवळ दुप्पट वेगाने वाढली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.