जाहिरात
मराठी बातम्या / देश / भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू, उद्या राष्ट्रमंचाची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू, उद्या राष्ट्रमंचाची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू, उद्या राष्ट्रमंचाची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP chief Sharad Pawar ) शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. शरद पवार यांनी उद्या म्हणजेच मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जून: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP chief Sharad Pawar ) शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. शरद पवार यांनी उद्या म्हणजेच मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला 15 पक्षांचे नेते सामील होणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत राष्ट्रमंच (Rashtra Manch) या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Meeting of 15 opposition parties) उद्या मोदी सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्र मंचाची उद्या 4 वाजता दिल्ली येथे बैठक होणार आहे. शरद पवार पहिल्यांदाच बैठकीत भाग घेतील. 2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंच स्थापन केला. सिन्हा आता टीएमसीचे उपाध्यक्ष आहेत. शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी रात्री दिल्लीत पोहचले. 23 जूनपर्यंत ते दिल्लीतच असणार आहेत. शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. हेही वाचा-  मोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक काही दिवसांपूर्वी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor)आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली. आज प्रशांत किशोर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी पोहोचले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होत आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. हेही वाचा-  प्रियंका गांधींनी केले ‘त्या’ 50 नेत्यांना फोन, दिला महत्त्वाचा निरोप मागील आठवड्यातच प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली होती. तब्बल 3 तासही बैठक सुरू होती. या बैठकीत देशासह राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात नव्याने रणनीती आखण्यात यावी, यासाठी काय नियोजन केले जावे, महाराष्ट्र विधानसभेत कशा पद्धतीने रणनीती आखली जावी, यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांच्यासोबत राज्यात रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने नियोजन करावे, काय समीकरण आखले जावे, मतदारसंघनिहाय कसे नियोजन असावे, याबद्दलही किशोर यांनी भाष्य केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात