• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • यूपी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या हालचाली सुरु, प्रियंका गांधी सक्रिय

यूपी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या हालचाली सुरु, प्रियंका गांधी सक्रिय

प्रियंका गांधींनी 50 नेत्यांना स्वतः फोन करुन एक खास निरोप दिला आहे. जाणून घेऊया त्यांनी नेमका कोणाला आणि कशासाठी फोन केला आहे.

 • Share this:
  उत्तर प्रदेश, 21 जून: उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा (UP Assembly Election 2022) निवडणुकीसाठी काँग्रेसनं हालचाली सुरु केल्या आहे. या निवडणुकीचा भार काँग्रेस (Congress)नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi)यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. स्वतः प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशमधील 50 नेत्यांना फोन करुन निवडणूक लढण्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. इतंकच नाही तर काँग्रेसनं येत्या ऑगस्टपर्यंत राज्यातील 200 हून अधिक जागांसाठी उमेदवारांची यादी फायनल करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्याअंतर्गत प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी झोननिहाय बैठक घेऊन उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे 50 उमेदवार निश्चित प्रियंका गांधी यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात यूपीच्या सुमारे 50 नेत्यांना फोन करुन 2022 च्या निवडणुका लढण्याची तयारी करा असं सांगितलं. प्रियंका यांनी फोनवर स्पष्ट सांगितलं की, निवडणुकीची तयारी करा, तुमचं तिकीट कन्फर्म आहे. यासह 2017 मध्ये विजयी झालेल्या 7 पैकी 5 आमदारांनाही निवडणूक लढवण्यास हिरवा कंदिल दिला. त्यांनी या सर्व नेत्यांना आपल्या क्षेत्रात पूर्ण लक्ष केंद्रित करणं आणि शक्य तितक्या लोकांना मदत करण्यास सांगितले आहे. याशिवाय सर्वांच्या आनंदात आणि दु: खामध्ये सामील व्हा आणि सरकारच्या वाईट धोरणांबद्दल त्यांना सांगा, असंही त्यांनी नेत्यांना म्हटलं आहे. हेही वाचा- राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचं वादळ, मुंबईतही व्हेरिएंटचा धोका? विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधींनी फोन करुन उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेस नेत्यांना निवडणूक लढण्यास सांगितले आहे त्यात शामली येथील पंकज मालिक, पुरकाजीमधून दीपक कुमार, बेहट इथून नरेश सैनी, सहारनपूरचे मसूद अख्तर, विलासपूरचे संजय कपूर, चमरौआचे युसुफ अली तुर्क, इलाहाबादचे अनुग्रह नारायण, पिंड्रा येथील अजय राय, मडिहानचे ललितेश त्रिपाठी, जैदपूर येथून तनुज, तामकुहीराज येथील अजय कुमार लल्लू, रामपूर खास येथील आराधना मिश्रा, जौनपूरचे नदीम जावेद, मथुरा येथील प्रदीप माथूर, कौलहून विवेक बंसल, कानपूर कँटचे सुहेल अंसारी आणि फरेंदाहून वीरेंद्र चौधरी यांचा समावेश आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: