Mars 2020: मंगळावर जायचं आहे? NASA देतंय बोर्डिंग पास, अशी आहे प्रक्रिया

30 सप्टेंबरपर्यंत मंगळावर जाण्यासाठी अर्ज करू शकता.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 03:51 PM IST

Mars 2020: मंगळावर जायचं आहे? NASA देतंय बोर्डिंग पास, अशी आहे प्रक्रिया

न्यूयॉर्क, 28 सप्टेंबर : एकीकडे भारत चंद्रावर पोहचला असताना अमेरिकेची स्पेस एजेंजी नासानं(NASA) चक्क लोकांनी मंगळावर पाठवण्याची सोय केली आहे. पुढच्या वर्षी मंगळ ग्रहावर नासा रोव्हर पाठवणार आहे. या मिशनवर नासा फक्त रोबोट पाठवणार आहे. मात्र नासा आता लोकांच्या नावांसह एक चिप पाठवणार आहे, त्याद्वारे हा रोबोट मंगळावर जाणार आहे. यासाठी नासानं लोकांनी नावे पाठवण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान 30 सप्टेंबर ही नावं पाठवण्याची अंतिम तारीख असणार आहे.

नासाला आतापर्यंत करोडो लोकांनी नावे पाठवली आहेत. अवकाशाबद्दल इच्छूक असणाऱ्यांनी येत्या दोन दिवसांत मंगळावर नावे पाठवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान ज्या लोकांनी आपली नावे पाठवली आहेत, त्यांना ऑनलाईन बोर्डिंगपास पाठवण्यात आला आहे.

नासा एका सिलिकॉन वेफर मायक्रोचीपवर एक इलेक्ट्रॉनिक बीमच्या मदतीनं मंगळावर उतरणार आहे. या चीपला रोव्हर घेऊन जाणार असून, ही चीप कायमस्वरूपी मंगळावर राहणार आहे. नासाच्या वतीनं जुलै 2020मध्ये ही टीप लॉंच केली जाणार आहे. ही चीप फेब्रुवारी 2021पर्यंत मंगळावर पोहचणार आहे. दरम्यान जी लोकं मंगळावर आपले नाव पाठवण्यास उत्सुक आहे, त्यांच्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला आहे.

वाचा-8.5 फूटाचा मासा, किंमत 23 कोटी! पाहा काय केलं ‘एका कोळियानं’

दरम्यान, 17 सप्टेंबरला नासानं या संदर्भात माहिती देताना एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये, “2021मध्ये आमचे #Mars2020 रोव्हर मंगळावर उतरणार आहे. त्याच्याकडे एक मायक्रोचीप असणार आहे. यामुळं लाखो लोकांची नावे मंगळावर जाणार आहे. त्यावर तुमचे नाव आहे का?”, असे ट्वीट केले होते.

Loading...

अशी आहे बोर्डिंगपास मिळवण्याची प्रक्रिया

1.सर्वात आधी या लिंकवर क्लिक करा https://mars.nasa.gov/participate/send-your-name/mars2020

2.त्यानंतर एक पेज ओपन झाल्यानंतर, तुमच्या देशाचे नाव, तुमचे नाव, पत्ता आणि ई-मेल आयडी इत्यादी माहिती द्या.

3.त्यानंतर तुमचा बोर्डिंगपास तयार होईल.

4.नासानं पाठवलेला हा बोर्डिंगपास डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट घ्या.

वाचा-फेसबुक युझर्ससाठी मोठी बातमी, पाहा तुमच्या लाइक्सचं काय होणार

हे आहे नासाच्या मंगळ मिशनचे उद्देश

नासा 2020मध्ये मंगळावर आपले रोव्हर पाठवणाक आहे. रोव्हर मिशन अनेक प्रश्नांचे उत्तर शोधणार आहे. यात मंगळावर मानव राहण्याची किती शक्यता आहेत? मंगळावर याआधी जीवन होते का? नासाचे रोव्हर मंगळावर खोदकाम करून यासंर्दभात माहिती शोधणार आहे.

वाचा-Amazon, Filpkart वर धमाकेदार ऑफर्स! 'या' वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काऊंट

साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 03:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...