Amazon, Filpkart वर धमाकेदार ऑफर्स! 'या' वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काऊंट

Amazon, Filpkart वर धमाकेदार ऑफर्स! 'या' वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काऊंट

नवारात्रीनिमित्तानं 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर Amazon आणि Filpkart वर खरेदी केल्यास विशेष सूट असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर: बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकवेळी दुकानांनमध्ये जाऊन खरेदी करणं शक्य नसतं. त्यामुळे आता सगळेचजण जवळपास ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. यावेळी तुम्ही घरबसल्या स्वस्तात मस्त आणि वेगवेगळ्या वस्तू अगदी तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. याचं कारण आहे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटने फेस्टिवल सिझनसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत.

29 सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत असल्यानं महिलांची विशेष खरेदीसाठी लगबग असते. नवरात्र आणि दिवाळीला खरेदी जास्त केली जात असल्यानं अमेझॉन आणि फ्लिपकार्टनं ग्राहकांसाठी सुवर्ण ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये अमेझॉनने Great indian festival इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तुंवर खास ऑफर्स, कॅशबॅक आणि गिफ्ट कार्ड मिळणार आहेत. रिचार्ज, बिल पेमेंट आणि सिनेमाच्या तिकीटांवरही खास कॅशबॅक ऑफर्स असणार आहेत. ह्या ऑफर्स 29 सप्टेंबरपासून 4 ऑक्टोबरपर्यंत असणार आहेत. 29 आणि 30 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून दुपारी 2 पर्यंत rush hours सेल असेल.

फ्लिपकार्डचा big billion days फेस्टिवल सेल आहे. यामध्ये अॅक्सिस आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर विशेष 10 टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय नवीन लाँच झालेले लिमिटेड एडिशनचे स्मार्टफोन्सही यावेळी उपलब्ध होणार आहेत. काही वस्तूंवर जवळपास 60 ते 90 टक्के ऑफची ऑफर देण्यात आली आहे.

गुगल पिक्सल 3 वर फिल्पकार्ड सेल अंतर्गत जवळपास 10 हजारांची सूट देत आहे. सॅमसंग, वीवो, वन प्लस आणि ओपो सारख्या ब्रॅण्डवर धमाकेदार सूट मिळणार आहे. त्यामुळे या फेस्टिवल सेलला तुम्ही खरेदी करायला विसरू नका.

टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं वेळीच थांबवा, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप!

ऑफर्स कशी पाहाल-

अमेझॉन आणि फ्लिपकार्डच्या वेबसाईटला लॉगऑन करा. त्यानंतर उजव्या कोपऱ्यात फेस्टिवरची ऑफर तुम्ही आजपासून पाहू शकता. यासोबतच बॅनरखाली ज्यावर ऑफर आहेत त्या वस्तूंवर क्लिक केल्यास तुम्हाला पर्याय येतात. बऱ्य़ाचदा आपण आपल्याला हव्या असलेल्या वस्तूचं नाव लिहून नुसतं सर्च करतो. अशावेळी ऑफर्स आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे आधी ऑफर्स काय आहेत हे पाहिलं तर स्वस्तात मस्त वस्तू तुम्ही घेऊ शकता.

खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही याची मात्र नक्की काळजी घ्यायला हवी आणि या फेस्टिवल सेलचा आनंद लुटायला हवा.

पुरामुळे 20 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला; दयनीय अवस्था दाखवणारा VIDEO

Published by: Kranti Kanetkar
First published: September 25, 2019, 1:30 PM IST
Tags: amazon

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading