8.5 फूटाचा मासा, किंमत 23 कोटी! पाहा काय केलं ‘एका कोळियानं’

8.5 फूटाचा मासा, किंमत 23 कोटी! पाहा काय केलं ‘एका कोळियानं’

आयर्लंडच्या समुद्र किनाऱ्यावर टुना मासा (Tuna Fish) नावाचा मासा आढळला. मात्र, या माशाची किंमत वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

  • Share this:

आयर्लंड, 28 सप्टेंबर : जगात अनेक अकलानीय गोष्टी घडत असतात. यात आता चक्क आयर्लंडच्या समुद्र किनाऱ्यावर टुना मासा (Tuna Fish) नावाचा मासा आढळला. मात्र, या माशाची किंमत वाचून तुम्हालाही धक्का बसेल. या माशाची किंमत आहे तब्बल 23 कोटी. आयर्लंडच्या किनाऱ्यावर एक इसमाला हा मासा सापडला, मात्र त्यानं लगेचच हा मासा पाण्यात टाकून दिला. वेस्ट कॉर्क चार्टड कंपनीचे डेव्ह अडवर्डला समुद्रात 8.5 फूट लांब ब्लुफिन टुना (Bluefin Tuna) मासा सापडला.

आयरिश मिररनं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षात सापडलेला हा सर्वात मोठा मासा आहे. हा मासा (Atlantic bluefin tuna) असून जपानमध्ये त्याची किंमत 3 मिलियन युरो म्हणजे जवळजवळ 23 कोटीपेक्षा जास्त आहे.

दरम्यान डेव्ह अडवर्ड आणि त्यांच्या टीमनं, मासा पकडण्यासाठी कोणत्याही अनैसर्गिक प्रकाराचा वापर केलेला नाही. त्यामुळं त्यांनी या ब्लुफिन टूना माशाला सोडून दिले. हा मासा जाळ्यात अडकल्यानंतर बोटीतून त्याला समुद्रात सोडण्यात आले आणि त्यानंतर त्याचे वजन करण्यात आले.

वेस्ट कॉर्क चार्टडच्या फेसबुक पेजवर हा माशाचा फोटो शेअर करण्यात आला. असा आहे 8.5 फूट माशाचा फोटो.

डेव्ह अडवर्ड आणि त्याच्या टीमनं 15 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात अड रिलीज प्रोग्राममध्ये भाग घेतला. या कार्यक्रमात 15 वेगवेगळ्या समुद्रांमध्ये फिरणार आहे. डेव्ह यांनी पकडलेल्या माशाचे वजन जवळजवळ 270 किलो होते.याआधी नॉर्वेच्या समुद्रात एक अजब दिसणारा मासा पकडण्यात आला होता, असा फोटो व्हायरल झाला होता. या माशाचे नाव रेअस फिश असे असून त्याचे डोळे फार मोठे होते.

19 वर्षांच्या ऑस्करनं हा मासा पकडला होता. हा मासा काहीसा डायनॉसॉर सारखा दिसणारा होता. याआधी तुम्ही असा मासा कधीच पाहिला नसेल.

साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण...

Published by: Priyanka Gawde
First published: September 28, 2019, 3:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या