बापरे! नियम मोडल्याबद्दल मोटारसायकल चालकाला तब्बल एक लाखाहून अधिक दंड

बापरे! नियम मोडल्याबद्दल मोटारसायकल चालकाला तब्बल एक लाखाहून अधिक दंड

रस्ते अपघातांचं वाढतं प्रमाण, वाहतूक कोंडी यामुळे रस्ते वाहतूक नियंत्रण विभाग अर्थात आरटीओ अत्यंत कठोरपणे नियमांची अंमलबजावणी करत असून, बेफिकीरपणे वाहन चालवणाऱ्यांना चांगली अद्दल घडवत आहे. एका मोटारसायकलस्वाराला याचा चांगलाच अनुभव आला आहे. वाहतुकीचे नियम मोडणं त्याला भलतंच महागात पडलं आहे.

  • Share this:

रायागडा, 14 जानेवारी : आजकाल वाहतूक नियंत्रण यंत्रणाही (Road Transport Regulatory System) डिजिटल झाली आहे. सिग्नलवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पोलिस नाहीत, म्हणून तुम्ही सिग्नल मोडला किंवा अन्य कोणत्याही वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास तुम्हाला तुमच्या मोबाइलवर फोटो आणि दंडाबाबत मेसेज येतो, किंवा पोलिसांनी कधी अडवलं तर आधी कधी नियमभंग केला असेल, तर त्याचीही सगळी माहिती त्यावेळी पोलिसांकडे मोबाईलवर उपलब्ध असते. त्यामुळे दंडाची सगळी रक्कम भरावी लागते. रस्ते अपघातांचं वाढतं प्रमाण, वाहतूक कोंडी यामुळे रस्ते वाहतूक नियंत्रण विभाग अर्थात आरटीओ अत्यंत कठोरपणे नियमांची अंमलबजावणी करत असून, बेफिकीरपणे वाहन चालवणाऱ्यांना चांगली अद्दल घडवत आहे.

मध्य प्रदेशातील (MP) एका मोटारसायकलस्वाराला याचा चांगलाच अनुभव आला आहे. वाहतुकीचे नियम मोडणं त्याला भलतंच महागात पडलं आहे. त्याला शे-हजार रुपये नव्हे, तर चक्क लाखात दंड भरावा लागला आहे. त्याला तब्बल 1 लाख 13 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुचाकीस्वाराला झालेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे.

(वाचा - 20 महिन्यांची चिमुकली जग सोडून जाण्याआधी वाचवून गेली 5 लोकांचा जीव)

ही घटना आहे मध्य प्रदेशातील रायागाडा जिल्ह्यातील आहे. प्रकाश बंजारा असं या मोटारसायकल स्वाराचं नाव असून तो मंदसौर जिल्ह्यातील अमरपुरा गावाचा रहिवासी आहे. तो मोटारसायकलवरून पाणी साठवण्याचे ड्रम्स विकण्याचा व्यवसाय करतो. नुकताच तो व्यवसायानिमित्त रायागडा शहरातील डीआयबी चौकात गेला असताना त्याला हेल्मेट न घालता गाडी चालवत असल्याबद्दल वाहतूक पोलीसांनी (RTO) पकडलं. हेल्मेट नसल्याबद्दल बंजारा याला एक हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगण्यात आलं.

(वाचा - Superb! आता फोटो काढण्यासाठी DSLR विसरा, Samsung लाँच करणार 200 मेगापिक्सलचा फोन)

त्यावेळी पोलीसांनी केलेल्या तपासणीत बंजारा यानं शेजारच्या राज्यातून गाडी खरेदी केली असून, नोंदणी न करताच ती व्यवसायासाठी वापरत असल्याचं उघड झालं. त्यामुळे त्याला 5000 रुपयांचा दंड करण्यात आला. तसंच त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स वैध नव्हतं त्यामुळे 5 हजार रुपये, तर गाडीचा विमा नसल्याबद्दल 2 हजार रुपये आणि हेल्मेट नसल्याबद्दल 1 हजार रुपये असा तेरा हजार रुपये आणि गाडी खरेदीच्या नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल एक लाख रुपये असा एकूण तब्बल 1 लाख 13 हजार 500 रुपये दंड ठोठावण्यात आला.

(वाचा - गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच भेटण्यासाठी 2000 किमी प्रवास केला, पण थेट तुरुंगात गेला)

इतकी मोठी रक्कम भरणं शक्य नसल्याने बंजारा याची मोटारसायकल रायागाडा शहर पोलिसांनी ताब्यात घेतली आणि दंडाची रक्कम जमा करून गाडी परत नेण्यास सांगितलं आहे. बंजारा यांच्या उदाहरणावरून इतर बेकायदेशीररीत्या वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांनाही चांगला धडा मिळाला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: January 14, 2021, 2:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading