मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

20 महिन्यांची चिमुकली जग सोडून जाण्याआधी वाचवून गेली 5 लोकांचा जीव

20 महिन्यांची चिमुकली जग सोडून जाण्याआधी वाचवून गेली 5 लोकांचा जीव

अवयव निकामी झाल्याने दर वर्षी भारतात सरासरी 5 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

अवयव निकामी झाल्याने दर वर्षी भारतात सरासरी 5 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

अवयव निकामी झाल्याने दर वर्षी भारतात सरासरी 5 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 14 जानेवारी : एक 20 महिन्यांची चिमुकली तिच्या निधनानंतरही समाजासाठी उत्तम उदाहरण ठरली आहे. 20 महिन्यांच्या चिमुकलीने 5 रुग्णांना आपले अवयव देऊन नवं जीवन दिलं आहे. धनिष्ठा नावाची ही चिमुकली सर्वात लहान वयाची डोनर ठरली आहे. 20 महिन्यांच्या धनिष्ठाने पाच जणांना तिचे अवयव दान केले. हृदय, लिवर, दोन्ही किडनी आणि दोन्ही कॉर्निया (डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा) दान केल्या आहेत. सर गंगा राम रुग्णालयाने तिचे हे अवयव काढून, इतर पाच रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले आहेत. 8 जानेवारी रोजी संध्याकाळी धनिष्ठा आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर खेळताना खाली पडली होती. पडल्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही या चिमुकलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. 11 जानेवारी रोजी डॉक्टरांनी धनिष्ठाला ब्रेन डेड म्हणून घोषित केलं. मेंदूव्यतिरिक्त तिचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत होते. अशा परिस्थितीतही चिमुकलीच्या आई-वडिलांनी आशिष कुमार आणि बबिता यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे आपल्या मुलीचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. आशिष कुमार यांनी सांगितलं की, आम्ही रुग्णालयात राहून असे अनेक रुग्ण पाहिले, ज्यांना अवयवांची अतिशय आवश्यकता आहे. आम्ही आमच्या धनिष्ठाला गमावलं आहे. परंतु तिचं अवयव दान करुन, केवळ तिचे अवयव इतर रुग्णांमध्ये जिवंत राहणार नाहीत, तर त्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठीही मदत होईल. चिमुकलीच्या या कुटुंबियांचं हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. इतरांनीही यातून प्रेरणा घेतली पाहिजे, असं सर गंगा राम रुग्णालयाने याबाबत बोलताना सांगितलं. तसंच 0.26 प्रति मिलियन इतका भारतात अवयव दानाचा सर्वात कमी दर आहे. अवयव निकामी झाल्याने दर वर्षी भारतात सरासरी 5 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. चिमुकलीने आपल्या मरणोत्तर इतर पाच जणांना जीवदान दिल्याने आणि तिच्या आई-वडिलांचा हा अवयव दानाचा हा निर्णय सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरत आहे.
First published:

पुढील बातम्या