मराठी बातम्या /बातम्या /देश /

राज्यात पावसाचा हाहाकार, ठाकरे शिंदे गटाशी जुळवून घेणार? राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप

राज्यात पावसाचा हाहाकार, ठाकरे शिंदे गटाशी जुळवून घेणार? राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 12 जुलै : सध्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. (Heavy Rain in Maharashtra) मुसळधार पावसाने अनेक जणांचा मृत्यू (Death Due to Rain) झाला आहे. तर काही ठिकाणी प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. यातच आता हवामान खात्याने (IMD on Maharashtra Rain) पुढील चार दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. आमदारांनंतर आता खासदारांनीही उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाशी जुळवून घेण्याची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत जाणून घ्या. नाशिकमध्ये रेड अलर्ट नाशिकच्या (Nashik Rain Update) अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यात पावसाचा हाहाकार (Heavy to heavy Rain) सुरू आहे. मुसळधार पावसामुळे 7 नद्यांना पूर आले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा सध्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. (Heavy Rain in Maharashtra) मुसळधार पावसाने अनेक जणांचा मृत्यू (Death Due to Rain) झाला आहे. तर काही ठिकाणी प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. यातच आता हवामान खात्याने (IMD on Maharashtra Rain) पुढील चार दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आमदारांनंतर खासदारही ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणार? सुत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. गृहमंत्री अमित शाह हे कृष्णा मेनन या निवासस्थानात राहतात. या निवासस्थानाला एकूण तीन प्रवेशद्वार आहेत. यापैकी मुख्य प्रवेशद्वार हे मेनन रोडवर आहे, तर या निवासस्थानाला एक मागील प्रवेशद्वार देखील आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उद्धव ठाकरेंवरील दबाव वाढला राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं चर्चेची दारं उघडी राहतील, असं मत खासदारांनी व्यक्त केलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट येणार एकत्र? 'आमचे राज्य आले आहे. शिंदेसाहेब आणि फडणवीस यांना चांगले राज्य करून द्या. आता मार्ग हा कुटुंबप्रमुखाने काढायचे असतो. आम्ही त्यांना विनंती करू शकतो पण त्यांना बांधील करू शकत नाही' असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांना साद घातली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आदित्य ठाकरेंविरोधात FIR दाखल करा, राष्ट्रीय बाल आयोगाचा आदेश महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ठाकरे यांच्यात वाद अजूनही सुरूच आहे. शिवसेनेचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी नोटीसच राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाच्या (National Commission for Child Rights) वतीने मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड राणा दाम्पत्याजवळचा; धक्कादायक आरोप 'अमरावतीला भाजप आतंकवादी व धर्मांध शक्तीची प्रयोगशाळा बनवत आहे का? कारण उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड हा राणा दाम्पत्याच्या जवळचा आहे.' माजी पालकमंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या गंभीर आरोपानंतर खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
First published:

Tags: Rain fall, Uddhav thackarey

पुढील बातम्या