मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Weather Update : मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट; पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update : मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट; पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊस होत आहे.

नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊस होत आहे.

नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊस होत आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 11 जुलै : सध्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. (Heavy Rain in Maharashtra) मुसळधार पावसाने अनेक जणांचा मृत्यू (Death Due to Rain) झाला आहे. तर काही ठिकाणी प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. यातच आता हवामान खात्याने (IMD on Maharashtra Rain) पुढील चार दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने काय म्हटलं - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनार्‍यावरील पूर्व-पश्चिम शियर, मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित होत आहे. यामुळे परिणामी 4-5 दिवसात मुंबई, ठाण्यासह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाऊस होणार आहे. तसेच मराठवाड्यातही या दिवसात पावसाचा जोर दिसणार आहे. हेही वाचा - Video : पर्यटन आलं अंगाशी, लोणावळ्यातील भुशी धरणात तरुण बुडाला नाशिकमध्ये मंदिरे बुडाली - नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊस होत आहे. यामुळे गोदावरी नदीखाली विविध मंदिरे बुडाली आहेत. 6 ते 7 जुलैपासून पुढचे काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार जिल्ह्यात पाऊस झाला. यासंबंधीचे व्हिडिओही व्हायरल होत आहे. वर्ध्यातही वीज कोसळल्याने तब्बल 24 मेंढ्या ठार - वर्ध्यातही मुसळधार पाऊस होत आहे. (Heavy Rain in Wardha) या पावसादरम्यानच वीज कोसळून याठिकाणी तब्बल 24 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. (Goat died due to lightning) शेतात चरायला गेलेल्या बकऱ्यांवर वीज पडली आहे. यामुळे तब्बल 24 बकऱ्या जागीच ठार झाल्या आहेत. तर या घटनेत मेंढपाळ हा थोडक्यात बचावला आहे. ही घटना गिरडच्या बाबा फरीद टेकडी शिवारात घडली.
First published:

Tags: IMD FORECAST, Konkan, Rain

पुढील बातम्या