मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड राणा दाम्पत्याजवळचा; धक्कादायक आरोप

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड राणा दाम्पत्याजवळचा; धक्कादायक आरोप

हत्याकांडाचा मास्टरमाईंड इरफान खान याने खासदार राणा यांचा प्रचार केला होता, अशीही माहिती सांगितली जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

अमरावती, 11 जुलै : 'अमरावतीला भाजप आतंकवादी व धर्मांध शक्तीची प्रयोगशाळा बनवत आहे का? कारण उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड हा राणा दाम्पत्याच्या जवळचा आहे.' माजी पालकमंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या गंभीर आरोपानंतर खळबळ उडाली आहे.

हत्याकांडाचा मास्टरमाईंड इरफान खान याने खासदार राणा यांचा प्रचार केला होता, असाही त्यांच्यावर आरोप आहे. उदयपूरची घटना 28 रोजी घडली. त्यापूर्वीच 27 तारखेला खासदार नवनीत राणा यांनी पत्र पाठवलं होतं. कोल्हे यांच्या हत्येची NIA चौकशी करा, कारण उदयपूरची घटना दोन्ही सारख्याच आहेत. याबाबत नवनीत राणा यांनी देशाचे गृहमंत्री यांना 27 तारखेला पत्र पाठवलं होतं.

28 रोजी उदयपूरची घटना घडली. त्यापूर्वीच 27 जुलै रोजीच नवनीत राणा यांना याची कल्पना होती. यशोमती ठाकूर यांच्या गंभीर आरोपानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी राणा दाम्पत्याची चौकशी करावी अशी मागणी माजी पालकमंत्री ठाकूर यांनी केली. देशातील अनेक मोठ्या घटनांमध्ये भाजपचा हात दिसतो. या घटनांची लिंक अमरावतीतून होते. पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

अमरावतीच वातावरण खराब करायचं हा सगळा सुनियोजित प्लॅन आहे, असे वक्तव्य भाजपचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी केले आहे.  अमरावतीच्या कोल्हे प्रकरणात राणा दाम्पत्यासह खासदार अनिल बोंडेना अटक करून त्यांची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली.

First published:

Tags: Amravati, Navneet Rana, Ravi rana