मुंबई, 11 जुलै : ‘आमचे राज्य आले आहे. शिंदेसाहेब आणि फडणवीस यांना चांगले राज्य करून द्या. आता मार्ग हा कुटुंबप्रमुखाने काढायचे असतो. आम्ही त्यांना विनंती करू शकतो पण त्यांना बांधील करू शकत नाही’ असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांना साद घातली. तसंच, मला विश्वास आहे की साहेब लवकरच आम्हाला आशिर्वाद देतील. 1-2 सदस्य असे आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंची रोज भेट मिळते, असा खुलासाही केसरकरांनी केला. सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. एक सर्वसाधारण शिवसैनिक बोलू शकत नाही. बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक बोलू शकत नाही. मन दुखवण्याचे प्रकार सोडून द्यावे. सर्व सामान्य शिवसैनिकांना वाटत नाही, काँग्रेसबरोबर जावे. तुम्ही हवे तर जनमताचा कौल घ्यावा. नगरपचायंचीच्या निवडणुका झाल्या. त्यात दिसून आले. आमची शक्ती काँग्रेस-राष्ट्रवादीने घ्यायची आणि आमचीच पक्ष संपवायचा हे योग्य नाही, अशी टीका केसरकरांनी केली. ‘मला कळले की आज खासदारांची बैठक झाली. त्यात दौपदी मुर्मू यांना समर्थन देण्याचे ठरले आहे. ही आनंदाची बातमी आहे. आम्ही कुणीही उद्धव साहेबांच्या वक्तव्यावर बोलणार नाही. आणि इतर कुणीही देवू नये अशी आमची भुमिका आहे. पण याचा अर्थ असा नाही की इतर लोक बोलले तर आम्ही काहीच बोलणार नाही. आम्ही आमच्या मित्र पक्षालाही सांगितले आहे की त्यांनी ही बोलू नये, असा इशाराही केसरकरांनी सोमय्यांचं नाव न घेता दिला. ( Amazon वर फुकट मोबाईलचा मेसेज तुम्हालाही आलाय का? फॉरवर्ड करण्यापूर्वी हे वाचाच ) मला १००-१५० कॅाल येतात. ते मी सगळे घेतो. अभिनंदन करतात. आणि शिंदेसाहेबांनी कधीही मदत केली ते सांगतात. पण त्यांचेही हेच म्हणणे आहे. की उद्धव साहेबांच्या आशिर्वादाने हे सरकार चालावे. मला विश्वास आहे की साहेब लवकरच आम्हाला आशिर्वाद देतील. १-२ सदस्य असे आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंची रोज भेट मिळते, असा खुलासाही केसरकरांनी केला. ( Aadhaar Card: तुमचं आधारकार्ड दुसरं कुणी वापरत नाही ना? अशी चेक करा हिस्ट्री ) आम्ही राष्ट्रीय पक्ष हे भाजपमुळे झालो आहोत. अमित शहांनी वारंवार आम्हाला भेट दिली. आम्ही साहेबांना म्हणत होतो की, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा आम्ही सगळे तुमच्या सोबत येतो. पण त्यांनी तसे केले नाही. आज पवारसाहेब जास्त लाडके झाले आहेत आणि शिवसैनिक लांबचे झाले आहे, अशी नाराजीही केसरकरांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.