मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

उद्धव ठाकरेंवरील दबाव वाढला; केसरकरांच्या विधानानंतर शिवसेना खासदारांचेही संकेत

उद्धव ठाकरेंवरील दबाव वाढला; केसरकरांच्या विधानानंतर शिवसेना खासदारांचेही संकेत

या सर्व घटनानाट्यानंतर शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा रंगली आहे.

या सर्व घटनानाट्यानंतर शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा रंगली आहे.

या सर्व घटनानाट्यानंतर शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा रंगली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 11 जुलै : 'आमचे राज्य आले आहे. शिंदेसाहेब आणि फडणवीस यांना चांगले राज्य करून द्या. आता मार्ग हा कुटुंबप्रमुखाने काढायचा असतो. आम्ही त्यांना विनंती करू शकतो पण त्यांना बांधील करू शकत नाही' असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांना साद घातली. यानंतर आता शिवसेनेच्या खासदारांनीही उद्धव ठाकरेंकडे भविष्यात भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं चर्चेची दारं उघडी राहतील, असं मत खासदारांनी व्यक्त केलं आहे. देशात भाजपने मोठी ताकद निर्माण केली आहे, आपण त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. शिंदेसोबत 50 आमदार आहेत. ते आजही मनाने आपलेच आहेत. आपण एकनाथ शिंदेंशीही जुळवून घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे आणि भाजपनं सत्ता स्थापन केली आहे. आपण दोघांशीही जुळवून घेतलं तर भविष्यात पक्षाचं हिताचं होणार आहे.

सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. एक सर्वसाधारण शिवसैनिक बोलू शकत नाही. बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक बोलू शकत नाही. मन दुखवण्याचे प्रकार सोडून द्यावे. सर्व सामान्य शिवसैनिकांना वाटत नाही, काँग्रेसबरोबर जावे. तुम्ही हवे तर जनमताचा कौल घ्यावा. नगरपचायंचीच्या निवडणुका झाल्या. त्यात दिसून आले. आमची शक्ती काँग्रेस-राष्ट्रवादीने घ्यायची आणि आमचीच पक्ष संपवायचा हे योग्य नाही, अशी टीका केसरकरांनी केली.  तसंच, मला विश्वास आहे की साहेब लवकरच आम्हाला आशिर्वाद देतील. 1-2 सदस्य असे आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंची रोज भेट मिळते, असा खुलासाही केसरकरांनी केला.

First published:

Tags: BJP, Eknath Shinde, Shivsena, Uddhav thacakrey