मराठी बातम्या /बातम्या /देश /

पोलीस असल्याचं सांगत आधी काढले फोटो, मग बॉयफ्रेंडसमोरच केला गर्लफ्रेंडवर बलात्कार

पोलीस असल्याचं सांगत आधी काढले फोटो, मग बॉयफ्रेंडसमोरच केला गर्लफ्रेंडवर बलात्कार

Girlfriend raped infront of boyfriend: चार तरुणांनी प्रेमी युगलाला रोखलं आणि मग बॉयफ्रेंडसमोरच तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Girlfriend raped infront of boyfriend: चार तरुणांनी प्रेमी युगलाला रोखलं आणि मग बॉयफ्रेंडसमोरच तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Girlfriend raped infront of boyfriend: चार तरुणांनी प्रेमी युगलाला रोखलं आणि मग बॉयफ्रेंडसमोरच तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Published by:  Sunil Desale
पाटणा, 20 नोव्हेंबर : तरुण आणि तरुणीला एकांतात पाहून तिच्यावर बलात्कार (rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करुन अल्पवयीन मुलीचे आधी फोटो काढले आणि मग तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. बिहारची (Bihar) राजधानी पाटाण्यातील फुलवारी शरीफ येथे ही घटना घडली आहे. (Minor girl raped in front of boyfriend) मोबाइलमध्ये फोटो काढले मग... पीडित तरुणीने सांगितले की, तिच्या मित्रासोबत ती बोलत होती त्यावेळी चार तरुण त्यांच्याजवळ आले. आपण पोलीस असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर माझ्या मित्राला त्यांनी धमकावलं, आमचे फोटोही काढले आणि मग मित्राला ओलीस ठेवून बलात्कार केला. चौघे आरोपी हे दोन दुचाकींवर तेथे आले होते. वाचा : नवरा तुरुंगात गेल्यानंतर पत्नीने सांभाळला अवैध व्यवसाय; साम्राज्य वाढवलं! पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची धमकी पीडित मुलीने सांगितले की, या चारही तरुणांनी आम्हाला इथे काय करता म्हणत जाब विचरण्यास सुरुवात केली. मग पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी आमचे मोबाइलमध्ये फोटो सुद्धा काढले. यानंतर चौघांनी छेड काढण्यास सुरुवात केली असता मित्राने त्यांना विरोध केला. यावेळी त्यांनी तरुण मित्राला ओलीस ठेवलं आणि मग झुडपात नेत तिच्यावर अत्याचार केले. तक्रार दाखल, पोलीस तपास सुरू या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, चार जणांनी मुलीवर बलात्कार केला. इतकेच नाही तर, मुलीच्या मित्रानेच हा सर्व कट रचला असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. वाचा : विचित्र घटना; योगशिक्षकाचं गुप्तांग कापून योगशिक्षिका म्हणाली I am Sorry! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोनीपत जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या गावात चौघांनी हे घृणास्पद कृत्य केल्य आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आपली कारवाई सुरू केली आहे. सोनीपत जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात चार जण मुलीच्या घरात शिरले. त्यानंतर या चौघांनी पीडित अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घटनेबाबत कुणालाही सांगितलं तर तुला जीवे मारू अशी धमकीही आरोपींनी दिली आणि त्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला.
First published:

Tags: Bihar, Crime, Patna, Rape

पुढील बातम्या