• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Shocking! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Shocking! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime News: एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 • Share this:
  सोनीपत, 19 नोव्हेंबर : एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार (Minor girl gang raped) केल्याची घटना समोर आली आहे. हरियाणातील सोनीपत (Sonipat) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोनीपत जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या गावात चौघांनी हे घृणास्पद कृत्य केल्य आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आपली कारवाई सुरू केली आहे. (minor girl gang raped by 4 mens in sonipat haryana) सोनीपत जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात चार जण मुलीच्या घरात शिरले. त्यानंतर या चौघांनी पीडित अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घटनेबाबत कुणालाही सांगितलं तर तुला जीवे मारू अशी धमकीही आरोपींनी दिली आणि त्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. वाचा : लग्नासाठी आईला केलं प्रपोज अन् मुलीशी थाटला संसार; डबल गेम करणाऱ्या जावयाचा खेळ खल्लास या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. चारही आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी दोन टीम तयार केल्या आहेत. पोलिसांच्या या दोन्ही टीम्स आसपासच्या परिसरात छापेमारी करत आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच खबऱ्यांच्या माध्यमातूनही पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेची माहिती देताना सदर पोलीस ठाण्याचे पोलीस प्रबारी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, एका अल्पवयीन मुलीच्या घरात शिरुन चौगांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चारही आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली आहे आणि तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. वाचा : अभ्यासासाठी दुसऱ्या मजल्यावर गेली अन् भयावह अवस्थेत आढळली; बंद खोलीत मुलीचं धक्कादायक कृत्य प्रपोजल नाकारल्याने तरुणीच्या आई-वडिलांवर गोळीबार इन्स्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर तरुणीनं प्रेमसंबंधांचा प्रस्ताव नाकारल्यामुळे भडकलेल्या तरुणाने तरुणीच्या आईवडिलांवर गोळीबार केल्याची घटना मध्यप्रदेशात घडली आहे. काही दिवसांपूर्वीच या तरुणाची इन्स्टाग्रामवर एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर काहीच दिवसात त्यांची मैत्री झाली. या काळात तरुण तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला. मात्र तरुणीने त्याचा प्रेमसंबंधांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर भडकलेल्या तरुणाने तिच्या घरी येऊन गोंधळ घातला. मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये राहणाऱ्या संस्कार परिहार नावाच्या तरुणाशी काही महिन्यांपूर्वी त्याच परिसरातील एका तरुणीशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. ऑनलाईन मैत्री करता करता या तरुणाचं तिच्यावर एकतर्फी प्रेम जडलं. तरुणीला भेटून त्याने प्रेमप्रकरणाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तरुणाने तो प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर तरुण वेगवेगळ्या मार्गाने तिच्याशी संपर्क साधत तिला हा प्रस्ताव स्विकारण्याची मागणी करू लागला. तरुणीने हा प्रकार तिचे वडील राजेश वाधवानी यांना सांगितला. त्यांनी तरुणाला गाठून त्याला समज दिली आणि आपल्या मुलीपासून लांब राहण्याची तंबी दिली. यामुळे चिडलेल्या संस्कारने आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा निर्णय घेतला.
  Published by:Sunil Desale
  First published: