जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / नवरा तुरुंगात गेल्यानंतर पत्नीने सांभाळला अवैध व्यवसाय; साम्राज्य वाढवलं!

नवरा तुरुंगात गेल्यानंतर पत्नीने सांभाळला अवैध व्यवसाय; साम्राज्य वाढवलं!

ताब्यात घेतलेल्या 45 वर्षीय महिलेसह आणखी एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

ताब्यात घेतलेल्या 45 वर्षीय महिलेसह आणखी एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

मात्र फार काळ ती अवैध व्यवसाय चालवू शकली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

रांची, 19 नोव्हेंबर : रांचीच्या (Ranchi News) सुखदेव नगर भागात पोलिसांनी गुप्त सूचनेच्या आधारावर कारवाई करीत काही लोकांना अटक केली आहे. या आरोपींकडून 30 ग्रॅम ब्राऊन शूगर जप्त केलं आहे. आरोपींच्या चौकशीनंतर ही बाब समोर (Crime News) आली आहे. रांची पोलिसांची टीम पलामू येथे गेले होते आणि तेथून रिजवाना ताज नावाच्या महिलेला अटक केली आहे. रांची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला लोकांना ड्रग्स सप्लाय करीत होती. ही महिला पतीचा अवैध व्यवसाय सांभाळत होती. अवैध कारणामुळे पलामू पोलिसांनी या व्यक्तीच्या पतीला 2017 मध्ये अटक करून तुरुंगात पाठवलं होतं. अद्यापही तो तुरुंगात आहे. पती तुरुंगात गेल्यानंतर पत्नी रिजवाना ताजने पतीचा धंदा सांभाळत होती. पती तुरुंगात गेल्यानंतर पत्नीने अवैध व्यवसाय वाढवला होता. (Wife runs illegal business after husband goes to jail) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव नगर पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार काही तरूण नशेची खरेदी आणि विक्री करीत होते. पोलिसांनी कारवाई करीत आनंद मुंडा, विकास सिंह आणि अमित कुमार याला तिघांना अटक केलं. यामध्ये सुखदेव नगर पोलिसांनी 28 ग्रॅम ब्राऊन शूगरसह एक मॉडेल आणि दोन व्यक्तींना अटक केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या मॉडेलचा नाव ज्योति भारद्वाज असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी मॉडेल गेल्या अडीच वर्षांपासून दिल्लीत राहत होती आणि सध्या रांचीला आली होती. ती गांधी नावाच्या ड्रग्स तस्करच्या संपर्कात आल्यानंतर या अवैध व्यवसायाशी जोडली गेली होती. हे ही वाचा- रस्ते अपघातात जखमीला शवगृहातील फ्रीजरमध्ये ठेवलं;सकाळी पाहिल्यानंतर परिसरात खळबळ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल नशेच्या पुड्या सप्लाय करण्यासाठी एजेंटदेखील भरती करीत होती आणि ड्रग्स घेणाऱ्या तरुणांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकून त्यांच्याकडून अवैध व्यवसाय करवून घेत होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात