मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /विचित्र घटना; योगशिक्षकाचं गुप्तांग कापून योगशिक्षिका म्हणाली I am Sorry!

विचित्र घटना; योगशिक्षकाचं गुप्तांग कापून योगशिक्षिका म्हणाली I am Sorry!

खाण्यातून अंमली पदार्थ देऊन त्या महिलेने धारदार हत्याराने गुप्तांग कापल्याचा आरोप त्या योगशिक्षकाने केला आहे.

खाण्यातून अंमली पदार्थ देऊन त्या महिलेने धारदार हत्याराने गुप्तांग कापल्याचा आरोप त्या योगशिक्षकाने केला आहे.

खाण्यातून अंमली पदार्थ देऊन त्या महिलेने धारदार हत्याराने गुप्तांग कापल्याचा आरोप त्या योगशिक्षकाने केला आहे.

  जयपूर, 19 नोव्हेंबर : राजस्थानच्या (Rajasthan) राजधानीचं शहर असलेल्या जयपूरमध्ये (Jaipur) एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे. योगशिक्षिकेने आपलं लिंग धारदार हत्याराने कापल्याचा (Woman Cuts Private part of Yoga Teacher) आरोप एका पुरुष योगशिक्षकाने केला आहे.

  पीडित योगशिक्षकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी झाल्या प्रकाराचा तपास सुरू केला आहे. जयपूरमधल्या (Jaipur) भांकरोटा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये पुरुष योगशिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, तो बिकानेरचा आहे. गेल्या तीन वर्षांपासून जयपूरमध्ये राहून तो शिकत आहे आणि योगशिक्षक म्हणूनही कार्यरत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची एका महिलेशी चांगली ओळख झाली. त्यानंतर ते दोघं एकमेकांच्या घरीही येऊ-जाऊ लागले. ती महिलाही योगशिक्षक (Yoga Teacher) म्हणूनच कार्यरत आहे.

  तक्रारीत पीडित योगशिक्षकाने लिहिलं आहे, की 16 नोव्हेंबर रोजी तो योग क्लास घेऊन झाल्यानंतर वैशालीनगरमधून कनक वृंदावन इथल्या आपल्या घरी जात होता. तेव्हा त्या योगशिक्षिकेने त्याला तिच्यासाठी दूध आणि भाजीपाला आणायला सांगितलं. तेव्हा तो ते सामान घेऊन त्या महिलेच्या गांधी पथावरच्या फ्लॅटमध्ये गेला. त्या महिलेने त्याच्यासाठी जेवण तयार केलं आणि तो तिथेच जेवलाही.

  हे ही वाचा-अभ्यासासाठी दुसऱ्या मजल्यावर गेली अन्...; बंद खोलीत मुलीचं धक्कादायक कृत्य

  जेवून झाल्यानंतर जेव्हा तो युवक आपल्या घरी जाऊ लागला, तेव्हा ती महिलाही त्याच्यासोबत त्याच्या घरी आली. घरी पोहोचता पोहोचताच त्याचा जीव अचानक घाबरल्यासारखा होऊ लागला आणि चक्कर येऊ लागली. म्हणून तो काही वेळ बेडवर झोपला. तेव्हा ती महिलाही त्याच्या घरीच होती. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जेव्हा त्याला जाग आली, तेव्हा गुप्तांगाजवळ वेदना होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आपले कपडे फाटले असल्याचं आणि बेडवर, तसंच फरशीवरही रक्त सांडलं असल्याचंही त्याला दिसलं. अशा जखमी अवस्थेत तो जेव्हा उठला, तेव्हा ती महिला त्याच्या फ्लॅटवर नव्हती.

  त्याने मदतीसाठी आवाज द्यायला सुरुवात केली; मात्र मध्यरात्र असल्याने त्याला शेजाऱ्यांकडून काही मदत मिळू शकली नाही. तेव्हा त्याने त्या महिलेला फोन लावला. त्यावर त्या महिलेने रडत रडत आय अॅम सॉरी असं म्हटलं. त्यानंतर त्याने तिला आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. थोड्या वेळाने ती आपली कार घेऊन आली आणि त्याला घेऊन एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेली. तिथल्या डॉक्टरांनी त्याला SMS हॉस्पिटलमध्ये पाठवलं. आता SMS हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खाण्यातून अंमली पदार्थ देऊन त्या महिलेने धारदार हत्याराने गुप्तांग कापल्याचा आरोप त्या योगशिक्षकाने केला आहे.

  First published:
  top videos

   Tags: Crime, Jaipur, PRIVATE part, Rajasthan