• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक संपली, भाजपविरोधात ठरला नवा प्लॅन?

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक संपली, भाजपविरोधात ठरला नवा प्लॅन?

या बैठकीमध्ये भाजपच्या विरोधात लढणाऱ्या सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा संकल्प पवार यांच्या वतीने करण्यात आला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 21 जून: लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला (BJP) सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फासे असे फेकायला सुरुवात केली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यासोबत नवी दिल्लीतील निवास्थानी सुरू असलेली बैठक संपली आहे. या बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीमध्ये मुक्कामी आहे. मुंबईतील भेटीनंतर प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. दुपारी 1 च्या सुमारास सुरू झालेली बैठक तब्बल 4 तास चालली. या बैठकीत देशातील आणि राज्यातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर भाजपला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न शरद पवार करत असून यासाठी जवळपास 15 राजकीय पक्षांची बैठक 6 जनपथ या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी होणाऱ्या या बैठकीमध्ये आम आदमी पक्षाचे संजय सिंग, राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा, तृणमूल काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे? आगामी 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकांची तयारी 3 वर्षापूर्वींपासून सुरू करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधी लढताना सर्व राजकीय पक्षांचे एकमत असावे, या उद्देशाने ही तयारी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्यासोबत शरद पवार यांची दिल्लीत बैठक झाली. यापूर्वीही प्रशांत किशोर यांनी मुंबईत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये तिसरी आघाडी स्थापन करता येईल का याची चाचपणी सध्या सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ही दुसरी बैठक झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. तरुणीनं कंडीशनरच्या जागी लिहिलं कंडोम; वडिलांनी मेसेज पाहिला अन्.... या बैठकीमध्ये भाजपच्या विरोधात लढणाऱ्या सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा संकल्प पवार यांच्या वतीने करण्यात आला आहे. डाव्या पक्षांच्या नेत्यांना देखील उद्या होणार्‍या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले असून या बैठकीच्या माध्यमातून विरोधी पक्षांना या मुद्द्यावर एकत्रितपणे लढण्याची तयारी करायची आहे. त्यासंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीच्या माध्यमातून विरोधी पक्षांना या मुद्द्यावर एकत्रितपणे लढण्याची तयारी करायची आहे. त्यासंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त राजकीय पक्षांना एकवटण्यासाठी प्रशांत किशोर यांची देखील मदत घेतली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
Published by:sachin Salve
First published: