Explainer : कोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे?

Explainer : कोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे?

कोरोना लसीकरणानंतर ती 30 मिनिटं खूप महत्त्वाची असतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जून : आजपासून देशात 18 सर्वांसाठी मोफत कोरोना लस (Corona vaccine) दिली जाते आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त लोक कोरोना लस exघेतील. तुम्हीसुद्धा कोरोना लस (Corona vaccination) घेणार असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर काही काळजी घेणं गरजेचं आहे. लस घेतल्यानंतर तुम्हाला माहिती असेल की लसीकरण केंद्रावरच तुम्हाला थोडा वेळ थांबवलं जातं. लसीकरणानंतर ती 30 मिनिटं खूप महत्त्वाची असतात.

कोरोना लस घेतल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम दिसतात. लसीकरणानंतर एखाद्या व्यक्तीला झालेल्या कोणत्याही त्रासाला AEFI म्हणजेच एडवर्स इवेंट फॉलोइंग इम्युनाइजेशन असं म्हटलं जातं. अशा दुष्परिणांपैकी काही लक्षणं ही लस घेतल्यानंतर तात्काळ दिसतात. म्हणजे त्या 30 मिनिटांच्या कालावधीतच दिसून येतात.

त्या 30 मिनिटांत काय होतं?

सरकारकडून अशा AEFI च्या प्रकरणांसाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीने कोरोना लसीकरणामुळे उद्भवलेल्या समस्यांचाही अभ्यास केला आहे.  या समितीनेच कोरोना लशीमुळे झालेल्या मृत्यूची माहिती दिली आहे. अहवालानुसार, 8 मार्च 2021 रोजी लसीकरणानंतर एका 68 वर्षीय व्यक्तीचा एनाफिलेक्सिसमुळे (Anaphylaxis) मृत्यू झाला. हे गंभीर असं अॅलर्जिक रिअॅक्शन आहे.

हे वाचा - मुंबईत कोरोनासोबतच या आजारानंही काढलं डोकं वर; डॉक्टरांनी दिला खबरदारीचा इशारा

नॅशनल AEFI समितीचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं, "कोरोना लशीमुळे देशात पहिला मृत्यू झालं आहे आणि याचं कारण आहे ते एनाफिलेक्सिस. यावरून कोरोना लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावरच 30 मिनिटं थांबणं का गरजेचं आहे, याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित होतं. बहुतेक एनाफिलेटिक्ट रिअॅक्शन याच कालावधीत दिसून येतात. त्याचवेळी योग्य उपचार मिळाले तर मृत्यूचा धोका टाळता येतो"

आतापर्यंत AEFI ची किती प्रकरणं?

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत तसे लशीचे सौम्य दुष्परिणाम दिसून आले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर एईएफआय झाल्याच्या घटना एकूण लसीकरणाच्या केवळ 0.01 टक्के एवढ्या आहेत. तर यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या एईएफआयच्या आकडेवारीनुसार 16 जानेवारी ते 7 जून दरम्यान 26,200 प्रकरणांची नोंद झाली आहे. एनाफिलेक्सिसच्या इतर 2 घटनांमध्ये 19 आणि 16 जानेवारी लसीकरण करण्यात आलेल्या दोन व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र उपचारानंतर ते बरे झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोरोना लशीचे दुष्परिणाम दिसल्यास काय कराल?

लसीकरण केल्यावर लस घेतलेल्यांनी ताप येत असल्याची तक्रार केली आहे. ताप येण्याबरोबर अंग दुखीही जाणवते. डॉक्टरांच्या मते एखादी लस जेव्हा आपल्या शरीरात जाते तेव्हा आपलं शरीर त्यावर रिऍक्शन (Reaction) देतं. त्यावेळी पॅरसिटामोलसारख्या गोळ्या घेतल्यास थोडं बरं वाटतं. मात्र अशा प्रकारे पेन किलरचं सेवन योग्य नाही. त्यामुळेच कोणत्याही औषधाशिवाय हा त्रास कमी कसा कारायचा याची माहिती असायला हवी.

यासंदर्भात तज्ज्ञांचं मत काय आहे याबद्दल अमर उजालाने एम्स रुग्णालयाच्या डॉक्टर आयशी पाल यांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. जास्त ताप येत असेल तर, डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा. थंड पाण्याने अंग पुसण्यानेही फायदा होते. थंडी वाजून ताप येत असेल, डोकं दुखत असेल तर, काही घरगुती उपाय किंवा काढे पिण्याने फायदा मिळतो. कोरोना व्हॅक्सिनेशननंतर आपल्या आहाराकडे लक्ष द्या. हेल्दी डाएटमुळे साईड इफेक्ट कमी व्हायला मदत होईल. थकवा जाणवत असेल तर पौष्टीक आहाराबरोबरच शरीरातील पाण्याची मात्रा चांगली रहावी यासाठी भरपूर पाणी प्या. नुसतं पाणी पिणं शक्य नसेल तर, लिंबू सरबत, ज्युस यांचं सेवन करा.

हे वाचा - आजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या

लसीकरणानंतर एक किंवा दोन दिवस त्याचे साईडइफेक्ट जाणवतात. पण जास्त त्रास जाणवला तर घरीच उपचार करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या.

Published by: Priya Lad
First published: June 21, 2021, 3:50 PM IST

ताज्या बातम्या