तरुणीनं कंडीशनरच्या जागी लिहिलं कंडोम; वडिलांनी मेसेज पाहिला अन्....

कर्स्टीनं आपल्या आईला कंडीशनर (Conditioner) आणण्यास सांगितलं होतं, मात्र प्रिडिक्टिव टेक्स्टमुळे कंडीशनरच्या जागी कंडोम (Condom) असं झालं.

कर्स्टीनं आपल्या आईला कंडीशनर (Conditioner) आणण्यास सांगितलं होतं, मात्र प्रिडिक्टिव टेक्स्टमुळे कंडीशनरच्या जागी कंडोम (Condom) असं झालं.

  • Share this:
    नवी दिल्ली 21 जून : अनेकदा आपण हा अनुभव घेतला असेल, की एका चुकीच्या शब्दामुळे संपूर्ण वाक्याचाच अर्थ बदलून जातो. असंच काहीसं घडलं, इंगलंडच्या एका हेअर ड्रेसरसोबत. तिच्याकडून मेसेज (Wrong message) पाठवताना एक शब्द चुकीचा गेला आणि तिच्या वडिलांनी तिला वेश्या (Prostitute) समजलं. इंगलंडच्या लिंकनशायरमधील क्लीथॉर्प्स येथे राहाणाऱ्या 34 वर्षीय कर्स्टी मॅकी हिनं आपल्या आईला मेसेज केला आणि कंडीशनर घेऊन येण्यासाठी सांगितलं. द सननं दिलेल्या रिपोर्टनुसार, कर्स्टीनं आपल्या आईला कंडीशनर (Conditioner) आणण्यास सांगितलं होतं, मात्र प्रिडिक्टिव टेक्स्टमुळे कंडीशनरच्या जागी कंडोम (Condom) असं झालं. VIDEO: योगा करणाऱ्या व्यक्तीसोबत तरुणीनं अचानक केलं असं काही, पाहून बसेल धक्का कर्स्टीनं सांगितलं, की तिचे वडील किचनमध्ये होते आणि याच ठिकाणी तिच्या आईनं आपला फोन चार्जिंगला लावला होता. यामुळे वडिलांनीचं माझा हा मेसेज वाचला आणि वेश्या असल्याचा त्यांचा समज झाला. यानंतर तिची वडील धावतच दुसऱ्या रुममध्ये गेले आणि तिच्या आईला ही गोष्ट सांगितली. VIDEO: भर मंडपात उफाळून आलं नवरदेवाचं प्रेम; नवरीला घेतलं उचलून अन्... कर्स्टी मॅकीनं (Kirsty McKee) सांगितलं, की हा मेसेज पाठवल्यानंतरही मला माझी चूक समजली नाही. मात्र, आईनं जेव्हा सांगितलं, की वडिलांनी हा मेसेज वाचून मला वेश्या समजलं आहे, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. कर्स्टीनं म्हटलं, की माझे वडील अगदी जुन्या काळातील आहेत. त्यामुळे हा मेसेज वाचून त्यांना धक्काच बसला. माझ्यासाठीही ही चूक अतिशय लाजवणारी होती. मात्र, नंतर आईनं सगळं स्पष्ट केल्याचं तिनं सांगितलं आणि तिच्यासाठी कंडीशनरही घेऊन आली.
    Published by:Kiran Pharate
    First published: