पणजी 10 मार्च : गोवा हे छोटंसं राज्य असलं, तरी तिथल्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे (Goa Assembly Election Result 2022 ). सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. अनेक वर्षं गोव्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलेले लोकप्रिय नेते मनोहर पर्रीकर यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यात त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना हव्या असलेल्या मतदारसंघात भाजपने तिकीट न दिल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. मात्र, आता उत्पल पर्रीकर यांचा पराभव होताना दिसत आहे. UP Election Result 2022: लखीमपूर शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका? मोठ्या संख्येने पिछाडीवर येताच उत्पल पर्रीकर मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले आहेत. यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, की आमच्यात खूप चांगला लढा होता. जनतेनं त्यांना निवडलं. भाजपमध्ये परत जाण्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, की मी आताच याबद्दल काही बोलू शकत नाही.
यूपीत भाजपची मुसंडी, महाराष्ट्रात नव्या बदलांची नांदी; भाजप नेत्याचं सूचक विधान
पणजीत भाजपने उत्पल यांना तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. उत्पल यांनी भाजप उमेदवारावर अनेक आरोप केले. या जागेवर दिवंगत मनोहर पर्रीकर दीर्घकाळ आमदार होते. याच मतदारसंघातून अपक्ष उभा राहात उत्पल यांनी निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे. दरम्यान नुकतंच समोर आलेल्या आकडेवारीनुसार गोव्यात 40 पैकी 18 जागांवर भाजप आघाडीवर आहे. काँग्रेस 10, अपक्ष 4, आप 2, एमजीपी 4, जीएफपी 1 तर आरजीपी 1 जागेवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. या आकडेवारीनुसार, गोव्यात जनतेचा कल भाजपला मिळाल्याचं दिसून येत आहे (Goa Result Live Updates).

)







