जाहिरात
मराठी बातम्या / देश / UP Election Result 2022: लखीमपूर शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका?

UP Election Result 2022: लखीमपूर शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका?

UP Election Result 2022: लखीमपूर शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका?

UP Election Result 2022: 403 जागांपैकी 264 जागांवर भाजप (BJP) आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप पक्ष मोठा पक्ष ठरला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उत्तर प्रदेश,10 मार्च: UP Election Result 2022: आज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh Assembly elections) निकाल लागला आहे. 403 जागांपैकी 264 जागांवर भाजप (BJP) आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप पक्ष मोठा पक्ष ठरला आहे. गोरखपूरमध्ये ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Gorakhpur, Chief Minister Yogi Adityanath) ही आघाडीवर आहेत. अशातच पश्चिम उत्तर प्रदेशचा कलही समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील पश्चिम भागात लखीमपूर हे क्षेत्र आहे. या क्षेत्रात झालेलं शेतकरी आंदोलन चांगलंचं गाजलं होतं. या भागातही भाजपनं मुसंडी मारली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात 136 जागांसाठी निवडणूक पार पडली. यात भाजप 84 जागांवर आघाडीवर आहे तर समाजवादी पार्टी 43 जागांनी पिछाडीवर आहे. बसपा 4 आणि काँग्रेस 1 जागा मिळाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर या भागात भाजपला फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आजच्या निकालानंतर हे चित्र पालटल्यासारखं दिसत आहे. लखीमपूर शेतकरी आंदोलन उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांनी कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेदरम्यान, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर, जवळपास 15 ते 20 शेतकरी जखमी झाले होते. या संपूर्ण प्रकारानंतर जाळपोळही झाली होती. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसले होते. काँग्रेस पाठोपाठ अन्य विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर या घटनेवरून जोरदार टीका करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात