कोरोनाच्या संकटात माणुसकी संपली? अपार्टमेंट-हॉस्पिटलमध्ये प्रवेश न दिल्यामुळे गर्भातच दगावलं बाळ

कोरोनाच्या संकटात माणुसकी संपली? अपार्टमेंट-हॉस्पिटलमध्ये प्रवेश न दिल्यामुळे गर्भातच दगावलं बाळ

सरकारने राबवलेल्या वंदे भारत मिशनअंतर्गत एक गर्भवती महिला भारतात पोहोचली. मात्र तिला अपार्टमेंट आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारल्याने तिच्या बाळाचा गर्भातच इलाजाअभावी मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मंगळुरू, 29 मे : संपूर्ण देशासह अवघं जग सध्या कोरोनाशी (Coronavirus) दोन हात करत आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेकजण एकमेकांना मदत करण्यासाठी तत्परता दाखवत आहेत. मात्र माणुसकीला काळीमा फासणाऱ्या काही घटना देखील या काळात घडत आहेत. अशीच एक घटना मंगळुरूमध्ये देखील घडली आहे, ज्यामुळे अनेकांचे डोळे पाणावले. सरकारने राबवलेल्या वंदे भारत मिशन (Vande Bharat Mission) अंतर्गत एक गर्भवती महिला भारतात पोहोचली. मात्र संशयामुळे तिला तिच्या अपार्टमेंटमध्ये आणि खाजगी हॉस्पिटमध्ये प्रवेश नाकारल्याने तिच्या बाळाचा गर्भातच इलाजाअभावी मृत्यू झाला आहे.

आज तकने यासंदर्भात बातमी दिली आहे. या वृत्तानुसार ही महिला वंदे भारत मिशनमधून भारतात परतली होती. यादरम्यान त्यांची केलेली कोरोना चाचणी नेगिटिव्ह आली होती. यानंतर त्या त्यांच्या मंगळुरूमधील अपार्टमेंटमध्ये गेल्या तर त्याठिकाणच्या असोसिएशनने त्यांना परवानगी नाकारली. या अपार्टमेंटमध्ये महिलेचा संपूर्ण परिवार राहतो.

(हे वाचा-कोरोनानं हिसकावलं एका आईचं सुख, 7 वर्षांनंतर दिला बाळाला जन्म पण...)

त्यानंतर ही महिला एका खाजगी दवाखान्यात इलाजासाठी गेली. मात्र ही महिला परदेशातून आल्याचे समजतात त्याठिकाणी तिच्यावर उपचार नाकारण्यात आले. त्याठिकाणाहून महिलेला बाहेर काढण्यात येऊ लागले आणि त्याचवेळी तिच्या गर्भातील बाळ दगावलं.

याप्रकरणी मंगळुरू महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अपार्टमेंट असोसिएशनला नोटीस पाठवली आहे. महिलेला प्रवेश नाकारण्यासंदर्भात काही सवाल त्यांनी विचारले आहेत. त्याचप्रमाणे आयुक्तांनी असे आदेश दिले आहेत की, या महिलेला तिच्या अपार्टमेंटमध्ये जाण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. तसे केल्यास संबधितांवर कारवाई होईल.

(हे वाचा-पोलिसांमुळे 33 मजूरांचा जीव धोक्यात, तब्बल 20 तास मृतदेहासोबत केला प्रवास)

First published: May 29, 2020, 1:00 PM IST

ताज्या बातम्या