कोरोनानं हिसकावलं एका आईचं सुख, 7 वर्षांनंतर दिला बाळाला जन्म पण...

कोरोनानं हिसकावलं एका आईचं सुख, 7 वर्षांनंतर दिला बाळाला जन्म पण...

एका महिलेला लग्नाच्या 7 वर्षानंतर बाळ झालं. तब्बल 7 वर्षांनंतर आई होण्याचं सुख मिळूनही याचा आनंद तिला घेता आला नाही.

  • Share this:

गुरुग्राम, 29 मे : देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. यात आता नवजात बालक आणि गरोदर मातांनाही कोरोनाचा धोका आहे. अशाच एक आईकडून कोरोनानं तिचं सुख हिसकावलं. हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यात एका महिलेला लग्नाच्या 7 वर्षानंतर बाळ झालं. तब्बल 7 वर्षांनंतर आई होण्याचं सुख मिळूनही याचा आनंद तिला घेता आला नाही. कारण या महिलेची कोरोना चाचणी केल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.

कोरोना संक्रमित महिलेनं सेक्टर 31 मध्ये असलेल्या रुग्णालयात मुलाला जन्म दिला. ही महिला दौलताबाद येथे राहणारी आहे. डॉक्टरांनी सिजेरियन डिलिव्हरी केल्यानंतर बाळ आणि आईची कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान आई कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर बाळाचे रिपोर्ट अद्याप आले नाही आहेत.

वाचा-मजुरांच्या जीवाशी खेळ सुरूच, श्रमिक ट्रेनमधला भयंकर VIDEO आला समोर

गुरुग्राममध्ये रुग्णांची संख्या पोहचली 400वर

गुरुग्रामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत 68 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं आता जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 405 झाली आहे. तर कोरोनामुळं 3 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-बेफिकीर मुंबईकरांनो काय करताय? लॉकडाऊनमधल्या जिवघेण्या वाहतूक कोंडीचे PHOTO

28 दिवसांत 348 नवीन कोरोना रुग्ण

मेच्या सुरुवातीला जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 348 होती. मात्र गेल्या 3 दिवसांत 121 नवीन रुग्ण सापडले आहेत. एकाच दिवसात आतापर्यंत सर्वात जास्त कोरोना रुग्ण जिल्ह्यात सापडले आहेत. जिल्ह्या प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 20 तर मंगळवारी 33 नवीन कोरोना रुग्ण सापडले.

वाचा-9 महिन्याच्या गरोदर महिलेला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने काढलं घराबाहेर

First published: May 29, 2020, 11:46 AM IST
Tags:

ताज्या बातम्या