कोलकाता, 29 मे : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी सध्या देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळं देशातील लाखो प्रवासी परराज्यात अडकले आहेत. त्यांना इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी सरकारनं ट्रेनही सुरू केल्या, मात्र या प्रवासादरम्यानही अनेक संकटांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. या सगळ्यात एक धक्कादायक घटना घडली. बसमधून घरी जाणाऱ्या मजूरांना चक्क 20 तास एका मृतदेहासोबत प्रवास करावा लागला. न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, प्रवासी मजूर बसमधून महाराष्ट्रातून बंगालला जात होता. रिपोर्टनुसार, या बसमध्ये 34 लोकं होती. बस आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर पोहचल्यानंतर एका प्रवाशाला ताप आला. त्याला श्वास घेण्यासही त्रास होता होता. त्याच्यावर उपचार होण्याआधीच या प्रवाशाचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती मुंबईमधील एका रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती. वाचा- कोरोनानं हिसकावलं एका आईचं सुख, 7 वर्षांनंतर दिला बाळाला जन्म पण… पोलिसांनी केली नाही मदत बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी दोन वेगळ वेगळ्या ठिकाणी ओडिशा पोलिसांकडून मदत मागितील. मात्र पोलिसांनी त्यांना मदत केली नाही. प्रवाशांनी असा आरोप केला आही की, त्यांना मदत करायची सोडून मृतदेहाबाबत सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांना राज्याच्या सीमेबाहेर जाण्यास सांगितले. वाचा- मजुरांच्या जीवाशी खेळ सुरूच, श्रमिक ट्रेनमधला भयंकर VIDEO आला समोर ताप आणि श्वास घेण्यास होत होता त्रास मुंबईहून बंगालला जाणाऱ्या या प्रवाशाला खूप ताप होता. सुदर्शन मंडल असं मृत प्रवाशाचं नाव आहे. प्रवासादरम्यान त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. चेकपोस्टवर इतर प्रवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सुदर्शनला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यासही सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना मदत केली नाही. अखेर या मृतदेहासोबत लोकांचा प्रवास करावा लागला. यावेळी मृतदेहाच्या समोरच्या सीटवर एक दोन वर्षांची मुलगीही बसली होती. एक-एक मिनिट जीव मुठीत धरून प्रत्येक प्रवासी घरी पोहचण्याची वाट पाहत होते. वाचा- 9 महिन्याच्या गरोदर महिलेला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने काढलं घराबाहेर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.