पाटणा, 25 डिसेंबर: बिहारमध्ये (Bihar) महिला आणि तरुणींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात परराज्यात विकणारी टोळी (man traffickers gang) सक्रिय झाली आहे. महिला, तरुणींचं अपहरण करून दिल्ली आणि राजस्थानात त्यांची दलालामार्फत विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यातील अनेक तरुणी बेपत्ता आहेत. मात्र तरी देखील पोलिसांनी ही बाब गांभीर्यानं घेतलेली नाही. बेपत्ता तरुणींचा शोध तर दूरच पण लव्ह अफेयर सांगून हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा...भूकंपानं तब्बल 51 वेळा थरथरली दिल्ली, अभ्यासकांनी दिले मोठ्या संकटाचे संकेत
पाटणा शहरात पोस्टल पार्कमधून एक महिना आधी बेपत्ता झालेल्या तरुणीचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्याचबरोबर गांधी मैदान परिसरातून एक अल्पवयीन मुलगी गायब झाली होती. तर काही महिन्यांपूर्वी पाटणा शहकातून अचानक मुली गायब झाल्या होत्या. आतापर्यत किमान डझनभर तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. आता तर एका पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचारी बेपत्ता झाल्याची महिती समोर आली आहे.
समस्तीपूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये ही महिला कार्यरत होती. ही महिला गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता आहे. महिला स्पेशल ट्रेनच्या स्कॉटमध्ये होती. या प्रकरणी आता पोलीस निरिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.
महिला संघटनांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बिहारमधील बेपत्ता झालेल्या एका तरुणीला हरियाणामध्ये विक्री करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
पत्रकार नगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे. राज्यातून तरुणी बेपत्ता प्रकरणामागे एक मोठं रॅकेट आहे. कारण बिहारमधील बेपत्ता झालेल्या काही इतर राज्यात सापडल्या आहेत. पाटणा शहरातील काही तरुणी दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामध्ये सापडल्या आहेत. राजीव नगर येथील 16 वर्षीय एक अल्पवयीन मुलीच्या मदतीनं पाटणा पोलीसांनी दिल्लीतून काही मुलींची सुटका केली आहे.
पाटणा शहरातील दोन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आरोपी हरियाणामध्ये घेऊन गेले होते. तिथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांची विक्री करण्यात आली होती. नंतर पाटणा पोलिसांनी एका दलालासह एकाच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यात एक आरोपी पाटणा येथील तर दूसरा हरियाणातील आहे. तर पत्रकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक मुलीला लग्नाचं आमिष दाखवून राजस्थानातील चिरावांमध्ये विकलं होतं. या तरुणीचा जबरदस्तीनं विवाह लावून देण्यात आला होता. झुनझुन येथील विनोद नामक एका व्यक्तीसोबत पीडितेचा विवाह लावला होता. तरुणी पाटणा येथे आल्यानंतर या गोष्टीचा खुलासा झाला होता.
हेही वाचा..रजनीकांत यांच्या प्रकृतीबद्दल Latest Update; इतक्यात रुग्णालयातून सोडणार नाही
पाटण्यातून 25 तरुणी बेपत्ता...
पाटणा जिल्ह्यातून जानेवारीपासून जुलैपर्यत या काळात 25 तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. त्यात पत्रकार नगरातील तरुणी परत आल्यानंतर पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण पीडित तरुणीनं कशीबशी आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आहे.
महिला संघटनांनी दिला इशारा...
आता या प्रकरणी पाटणा शहरातील महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांनी पुढील 10 दिवसांत बेपत्ता झालेल्या तरुणींचा शोध घेतला नाही, टोळीतील आरोपींना अटक केली नाही तर ठिय्या आंदोलन केलं जाईल, असा इशारा महिलांनी पोलिसांना दिला आहे.