हैदराबाद, 25 डिसेंबर: अभिनेता सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हैदराबादमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रजनीकांत यांच्यामध्ये कोव्हिड-19 ची कोणतीही लक्षण आढळून आली नाहीत, पण रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे. सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं दिवसभरात त्यांच्या तब्येतीमध्ये काय फरक पडला आहे, याबाबत रुग्णालयानं माहिती दिली आहे.
अपोलो रुग्णालयानं रजनीकांत यांचं नवे हेल्थ बुलेटिन जारी केलं आहे. त्यानुसार रजनीकांत यांना रक्तदाब नियंत्रणाची औषधं देण्यात आली आहे. आज रात्री ते रुग्णालयात राहतील. उद्या पुन्हा त्यांची पुढील तपासणी होईल.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण त्यांना आरामाची गरज आहे. ते कुणालाही भेटणार नाहीत. त्यांची मुलगी त्यांच्यासोबत आहे, ती त्यांची काळजी घेते आहे. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी कुणीही रुग्णालयात येऊ नये, असं आवाहन त्यांचं कुटुंब आणि रुग्णालय प्रशासनानं केलं आहे.
हे वाचा - आजारातून बरं झाल्यानंतर रेमो डिसूझांचा पत्नीबरोबर खास डान्स,ख्रिसमस स्पेशल VIDEO
गेल्या 10 दिवसांपासून ते हैदराबाद याठिकाणी एका सिनेमाचं शूटिंग करत होते. नयनतारा आणि रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते हैदराबादमध्ये होते. त्यांनी शूटिंगला सुरुवातही केली, मात्र शूटिंगच्या क्रूमधील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं. अन्नाथे (Annaatthe shooting) या सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं. 22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. त्या दिवसापासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. मात्र सध्या त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हैदराबादमधीलच रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
हे वाचा - महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप; 'या' महिलेने केला मोठा खुलासा
तेलंगणाच्या राज्यपालांनी रजनीकांत यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांकडे विचारपूस केली आहे आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.