Home /News /news /

2020 मध्ये भूकंपानं तब्बल 51 वेळा थरथरली दिल्ली, अभ्यासकांनी दिले मोठ्या संकटाचे संकेत

2020 मध्ये भूकंपानं तब्बल 51 वेळा थरथरली दिल्ली, अभ्यासकांनी दिले मोठ्या संकटाचे संकेत

दिल्लीत वारंवार भूकंप येत आहेत. त्यामुळे भविष्यात मोठं संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही अभ्यासकांनी सांगितलं आहे.

    नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर: सन 2020 वर्ष लवकरच आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. या वर्षात कोरोना संसर्गानं (Coronavirus) राजधानी दिल्लीला (delhi) परेशान केलं जितकं नाही तितकं भूकंपांच्या (earthquake) धक्क्यांनी केलं. सन 2020 मध्ये दिल्‍ली जवळपास 51 वेळा भूकंपानं थरथरली. सुदैवानं हे भूकंप कमी तीव्रतेचे होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. तसेच कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही. मात्र, भूगर्भ अभ्यासकांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. ही वादळापूर्वीचे संकेत असल्याचं म्हटलं आहेय. दिल्लीत वारंवार भूकंप येत आहेत. त्यामुळे भविष्यात मोठं संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही अभ्यासकांनी सांगितलं आहे. हेही वाचा...नितीश कुमारांना मोठा धक्का; जदयूचे 6 आमदार लागले भाजपच्या गळाला धनबाद येथील आयआयटीचे सीस्‍मोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख पी.के. खान यांनी सांगितलं की, कमी तीव्रतेच्या भूकंपाचे वारंवार धक्के बसत असतील तर एक मोठा भूकंप येण्याचे संकेत समजले जातात. गेल्या दोन वर्षात दिल्‍ली-एनसीआरमध्ये 4 ते 4.9 रिश्टर स्‍केल तीव्रतेच्या भूकंपाचे तब्बल 64 धक्के जाणवले. त्यात 5 रिश्टर स्केल किंवा त्या पेक्षा जास्त तीव्रता असलेले भूकंप 8 वेळा आले होते. याचा अर्थ असा की या भागात स्‍ट्रेन एनर्जी वाढत आहे. विशेष म्हणजे नवी दिल्‍ली इंडियन प्लेट्सच्या अंतर्गत भागात आहे. दिल्‍ली-हरिद्वार रिजवर कायम हलचाली होत आहेत. 'एनबीटी'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, देहरादून येथील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जियोलॉजीचे प्रमुख डॉ. के सेन यांच्या मते, इंडियन प्लेट्सच्या अंतर्गत भागात असलेल्या दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचा इतिहास फार प्राचिन आहे. दिल्‍ली एनसीआरमध्ये भूकंपाचं वारंवार धक्के जाणवतात. धक्के कमी तीव्रतेचे आहेत. मात्र, ते एका मोठ्या भूकंपाचं कारण बनू शकतात, असंही डॉ. के सेन यांनी सांगितलं आहे. दिल्‍ली–एनसीआर संवेदनशील... रिपोर्ट्सनुसार,दिल्ली-एनसीआर सीस्मिक झोन-4 मध्ये मोडतातय त्याचा अर्थ असा की, या झोनमध्ये भूकंपाचा धोका जास्त असतो. 2014 मध्ये नॅशनल सेंटर ऑफ सिस्मेलॉजीनं (NCS) दिल्‍ली-एनसीआरची मायक्रो झोन स्टडी केली होती. दिल्‍लीचा जवळपास 30 टक्के भाग झोन -5 मध्ये येतो. भाग भूकंपाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील समजला जातो. याच भागातील सर्व बिल्डिंग भूकंप रोधक तंत्रज्ञानानुसार बनलेल्या असाव्यात. दिल्‍लीतील दिल्‍ली-हरिद्वार रिज, महेंद्रगड-देहरादून सबसरफेस फॉल्‍ट, मुरादाबाद फॉल्‍ट, सोहना फॉल्‍ट, ग्रेड बाउंड्री फॉल्‍ट, दिल्‍ली-सरगोधा रिज, यमुना रिव्हर लायनामेंट, गंगा रिव्हर लायनामेंट परिसर अत्यंत संवेदनशील आहे. हेही वाचा...रजनीकांत यांच्या प्रकृतीबद्दल Latest Update; इतक्यात रुग्णालयातून सोडणार नाही आपण अशी वाचवू शकतो दिल्ली... वाडिया इन्स्टिट्यूटचे डायरेक्‍टर कलाचंद साई यांनी सांगितलं की, भूकंपापासून दिल्‍ली सुरक्षित ठेवण्यासाठी लोकल अथॉरिटीजनं पुढे येण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक निर्माणाधीन बिल्डिंगच्या बांधकामावर लक्ष ठेवावं लागणार आहे. ब्‍यूरो ऑफ इंडियन स्‍टँडर्ड्सच्या नियमावलीनुसार बांधकाम होत आहे की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण दिल्‍ली भूकंपाच्या दृष्टीकोनातून सर्वात जास्त संवदेनशील हिमालयन रिझनपासून केवळ 200 किलोमीटर अंतरावर आहे
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Delhi

    पुढील बातम्या