उत्तर प्रदेश, 09 जुलै : कुख्यात गुंड मुन्ना बजरंगी याची आज उत्तर प्रदेशच्या बागपत जेलमध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. आज बसपचे माजी आमदार लोकेश दीक्षित यांच्याविरोधातल्या आरोपांबद्दल आज बागपत कोर्टात त्याला हजर करण्यात येणार होतं. त्यासाठी त्याला रविवारी झांसीतून बागपतला आणण्यात आलं. पण कोर्टात हजर करण्याआधीच त्याच्यावर तुरूंगात गोळ्या घालण्यात आल्या. या सगळ्यात मोठ्या सुपारी किलर मुन्ना बजरंगी याच्या हत्येमुळे परिसर हादरून गेला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. मुन्ना बजरंगीचं खरं नाव प्रेम प्रकाश सिंह आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे बजरंगीची पत्नी सीमा सिंहने 10 दिवसांआधी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुन्ना बजरंगीची हत्या होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. महाराष्ट्राच्या ‘या’ भागांत हवामान खात्याने वर्तवला अतिवृष्टीचा इशारा सीमा म्हणाली की, झांसी जेलमध्ये मुन्ना बजरंगीच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. एका एसटीएफ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला असल्याचा तिने आरोप केला होता. या अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार मुन्नाला जेवणातून विष दिलं असल्याचा आरोपही तिने केला होता. आणि आज सकाळी कोर्टात जाण्याआधी मुन्नाची गोळ्या झाडून हत्या केल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. बजरंगीच्या जीवाला अनेक लोकांपासून धोका आहे त्यामुळे त्याला बागपत जेलमध्ये शिफ्ट करण्यासाठीची मागणीही सीमाने केली होती. पण अखेर सीमाची शंका खरी ठरत आज सकाळच्या दरम्यान मुन्नावर गोळ्या झाडण्यात आल्या. मुन्नाचा जन्म 1967मध्ये उत्तर प्रदेशच्या जौनपुरमध्ये झाला. शिकून मोठा ऑफिसर व्हावा अशी त्याच्या वडिलांची म्हणजेच पारसनाथ सिंह यांची इच्छा होती. पण 5वीमध्ये असतानाच मुन्नाने शाळा सोडली आणि या हाणामारी क्षेत्रात शिरला. हेही वाचा…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.