S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :एसटीचा प्रवास ठरला अखेरचा,बसखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू
  • VIDEO :एसटीचा प्रवास ठरला अखेरचा,बसखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू

    Published On: Jul 8, 2018 07:18 PM IST | Updated On: Jul 8, 2018 07:29 PM IST

    ज्या बस मधून बाहेर उतरलेल्या वृद्ध महिलेचा त्याच बस खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटणा साताऱ्यामधील एसटी स्थानकावर घडली. शकुंतला जंगम असं या महिलेचं नाव असून दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. सातारा बस स्थानकावर सुट्टीमुळे गर्दी होती. यावेळी सांगली फलाटाजवळ सातारा - सांगली एम एच 14 बीटी 3270 ही एसटी लागत असताना अचानक या वृद्ध महिला बसच्या पुढच्या बाजूने जात असताना बस ड्रॉवव्हरला त्या न दिसल्याने अपघात झाला आणि त्यात महिला जागीच ठार झाली. महिलेच्या डोक्यावरून एसटीचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली. पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जमावाला हटवून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close