S M L

...अशा राजपुत्राला सिंहासनावर बसवू नका - अमित शहा

'राजाचा पुत्र सूज्ञ नसल्यास त्याला कदापि सिंहासनावर बसवू नका ही शिकवण खुद्द चाणक्यानंच दिली आहे.'

Updated On: Jul 9, 2018 08:16 AM IST

...अशा राजपुत्राला सिंहासनावर बसवू नका - अमित शहा

पुणे, 09 जुलै : 'राजाचा पुत्र सूज्ञ नसल्यास त्याला कदापि सिंहासनावर बसवू नका ही शिकवण खुद्द चाणक्यानंच दिली आहे.' अशा शब्दात भाजपाध्यक्ष अमित शाहांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. पुण्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्याख्यानात ते बोलत होते. आजच्या स्थितीत चाणक्य या विषयावर त्यांनी यावेळी व्याख्यान दिलं. भाजपच्या रणनीतीचं तोंडभरुन कौतुक करताना त्यांनी काँग्रेसच्या वाटचालीवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, राष्ट्र महान आहे, राजा महान नाही. त्यामुळे एका राजाचा एकच जरी एकच पुत्र असला तर तो सूज्ञ नसल्यास त्याला सिंहासनावर बसवू नका असं अमित शहा म्हणाले आहे. राज्य सांभळण्यासाठी राजामध्ये क्षमता हवी नाहीतर असा राजा नको असा टोलाही अमित शहा यांनी लगावला. राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका करत अमित शहा यांनी चाणक्यांवर व्याखान केलं आहे.

काल रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्याख्यात ते बोलत होते. आजच्या स्थितीत चाणक्य या विषयावर त्यांनी यावेळी व्याख्यान दिलं. यात भाजपच्या रणनीतीचं तोंडभरुन कौतुक करताना त्यांनी काँग्रेसच्या वाटचालीवर जोरदार निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 08:16 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close