News18 Lokmat

मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हर-फ्लो

आजपासून पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2018 04:55 PM IST

मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हर-फ्लो

मुंबई, 09 जुलै : मुंबई-ठाण्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या २४ तासांत अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. पूर्व विदर्भातही 9 आणि 10 जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरील नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहान केलं आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस काही केल्या थांबायचं नाव अजूनही घेत नसल्यामुळे मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पश्चिम आणि  मध्य रेल्वेचे अनेक ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत होत्या.

मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. अकरावी प्रवेशाला मुदत वाढ जेण्वायात आली असून उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. तसेच मुंबई विद्यापीठातील आज होणारे प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पावसाच्या तडाख्यामुळे बोरिवली पश्चिम येथील शिंपोली विभागातील पॉप्युलर टायरेस इमारतीचा काही भाग एका बाजूला झुकला. यामुळेच तेथील रहिवाश्यांना इमारतीतील काही घरं रिकामी करण्याचं सांगण्यात आलं. महानगर पालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. इमारतीतील इतर रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

या सगळ्या गदारोळात मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमीही आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. मुंबई आणि मुंबई परिसरात दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलावांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे महिनाभर आधीच तुळशी तलाव तुडूंब भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी हा तलाव ऑगस्ट महिन्यात भरला होता.

हेही वाचाः

पश्चिम मुंबईमध्ये 'या' ठिकाणी होतोय मुसळधार पाऊस

Loading...

मध्य रेल्वेचा खेळ खंडोबा, या भागांमध्ये भरले पाणी

अवघ्या 11 दिवसांत कोर्टाने दिली 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 07:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...