भीषण अपघात! भरधाव ट्रकनं भाजी विक्रेत्या 6 शेतकऱ्यांना चिरडलं

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले.

  • Share this:
    इटावा, 20 मे : भाजी विकण्यासाठी घेऊन जाणाऱ्या पिकअप आणि ट्रकची जोरदार धडक झाली. ट्रकने जोरदार धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. या अपघातामध्ये 6 भाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. तर काही शेतकरी जखमी झाले आहेत. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. हा भीषण अपघात उत्तर प्रदेशातील इटावा इथे पोलिस फ्रेंड्स कॉलनी परिसर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 02 वर झाला. या प्रकरणी पोलिसांनी धडक देणाऱ्या ट्रकला ताब्यात घेतलं मात्र ट्रक चालक अद्यापही फरार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इटावामधील अपघातातबाबत शोक व्यक्त केला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. हे वाचा-कोरोनामुळे हादरलं राज्यचं पोलीस दल, बाधितांचा धक्कादायक आकडा आला समोर हे वाचा-हिजबुलच्या कमांडरसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीरात सुरक्षा दलाला मोठं यश हे वाचा-डोक्याला बाशिंग अन् तोंडाला चांदीचा मास्क; कोरोना लॉकडाऊनमधील लग्नाचा निराळा थाट
    First published: