हिजबुलच्या कमांडरसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीरात सुरक्षा दलाला मोठं यश

हिजबुलच्या कमांडरसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीरात सुरक्षा दलाला मोठं यश

हिजबुलचा मोठा दहशतवादी श्रीनगरमध्ये लपून बसल्याचं समजल्यानंतर पोलीस आणि जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केल्यानंतर घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

  • Share this:

श्रीनगर 19 मे: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला आज मोठं यश मिळालं. या चकमकीत हिजबुलच्या एका टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दहशतवादी लपून असलेलं घर सुरक्षा दलांनी उडवून दिलं. गेल्या काही महिन्यांमध्ये राजधानी श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच अशी मोठी चकमक झाली आहे. मारला गेलेला दहशतवादी जुनैद सहराई हा कट्टर विभाजनवादी नेते मोहम्मद सहराई यांचा मुलगा आहे.

या चकमकीत सुरक्षा दलांचे तीन जवानही जखमी झालेत. ही चकमक सुरू असतानाच नागरिकांनी दहशतवाद्यांच्या बचावासाठी दगडफेक केली होती. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना हुसकावून लावलं. आणि आजुबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला. हिजबुलचा प्रमुख रियाज नायकू ठार झाल्यानंतर जुनैदचं ठार होणं हे सुरक्षा दलाला मिळालेलं मोठं यश आहे.

 दोन वर्षांनंतर श्रीनगरमध्ये रात्री उशिरा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. कोरोना व्हायरसच्या महासंकटाचा सामना करत असतानाच रात्री उशिरा कानेमजार नवाकदल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चमकम झाली. या चकमकीनंतर श्रीनगरमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद कऱण्यात आली आहे.

सुरक्षा दल आणि पोलिसांनी मिळून दहशतवाद्यांविरोधी केलेल्या सर्ज ऑपरेशनदरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्य दलानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काही दहशतवादी घरांमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवान-पोलिसांनी हे सर्ज ऑपरेशन सुरू केलं होतं.

गाणी ऐकून बरे होणार कोरोना रुग्ण; 'या' रुग्णालयाने सुरू केले उपचार

हिजबुलचा मोठा दहशतवादी श्रीनगरमध्ये लपून बसल्याचं समजल्यानंतर पोलीस आणि जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केल्यानंतर घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. याआधी रविवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ताहिर अहमद भटला ठार करण्यात आलं होतं. 11 दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या रियाज नायकू नंतरची ही दुसरी मोठी चकमकी होती.

अरे देवा! कोरोनासह आता भारतात कावासाकीचं संकट; देशात आढळला पहिला रुग्ण

16 मे रोजी रात्री डोडा इथल्या खोत्रा ​​गावात सुरक्षा दलाला ताहिर लपून बसल्याची माहिती मिळाली. जानेवारीपासून ताहिर हिजबुलचं संघटन करत असल्याची माहिती मिळाली होती. रविवारी सकाळी सातच्या सुमारास घराच्या आत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर 5 तासांच्या चकमकीनंतर ताहिरचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळालं. रात्री उशिरा झालेली श्रीनगरमधील ही दुसरी मोठी चकमक असल्याचं सांगितलं जात आहे.

 

 

First published: May 19, 2020, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading