ठाणे 19 मे: राज्यातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी गेले तीन महिन्यापेक्षा अधिक लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र पोलीस कार्यरत आहेत, पण यामुळेच पोलीस विभागात कोरोनाची लागण अधिक झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात वेगवेगळ्या शहरात तब्बल 12 पोलिसांना या रोगामुळे मृत्यू आला आहे. त्यात सर्वाधिक मुंबई शहरातील सात पोलीस आहेत तर एक वरिष्ठ अधिकारी आहे पुणे सोलापूर शहर नाशिक ग्रामीण अशा शहरांमध्ये देखील प्रत्येकी एक असे मृत्यू झाले आहेत. राज्यातील 136 पोलीस अधिकारी यांना या विषाणूची लागण झाली असून यात PSI, API, PI, IPS दर्जाचेही अधिकारी आहे. राज्यातील 1192 पोलीस कर्मचारी हे पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्याा ठिकाणी उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर यासंदर्भात काही लक्षणे आढळली तर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी राज्यात वेगवेगळ्याया ठिकाणी नियंत्रन कक्ष स्थापन केला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात मुंबई शहरात मोठ्या संख्येने पोलिसांमध्येेे लागण होत असल्याने त्यांचे मनोबल कमी होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी सरकारही अनेक उपक्रम राबवत आहे. नागरिकांनी योग्य सहकार्य केलं तर पोलिसांवरचा बरासचा ताण कमी होईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. लोकांनी लॉकडाऊनच्या किमान नियमांचं पालन करावं असं आवाहनही पोलिसांकडून केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.