मराठी बातम्या /बातम्या /देश /बायकोसोबत नवऱ्याचं राक्षसी कृत्य; पत्नीच्या खोलीत कोब्रा सोडून दिला भयंकर मृत्यू, धक्कादायक कारण समोर

बायकोसोबत नवऱ्याचं राक्षसी कृत्य; पत्नीच्या खोलीत कोब्रा सोडून दिला भयंकर मृत्यू, धक्कादायक कारण समोर

Wife Murder Case: एका तरुणानं आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी थेट अतिविषारी कोब्रा सापाचा (Used cobra snake for wife murder) वापर केला आहे.

Wife Murder Case: एका तरुणानं आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी थेट अतिविषारी कोब्रा सापाचा (Used cobra snake for wife murder) वापर केला आहे.

Wife Murder Case: एका तरुणानं आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी थेट अतिविषारी कोब्रा सापाचा (Used cobra snake for wife murder) वापर केला आहे.

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: एका तरुणानं आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी चक्क अतिविषारी कोब्रा सापाचा (Used cobra snake for wife murder) वापर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं आपल्या पत्नीच्या खोलीत कोब्रा साप सोडून, सर्पदंश घडवून तिची हत्या (Murder by cobra snake bite) केली आहे. पण मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यामुळे पतीचा हा बनाव उघडा पडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक (Accused husband arrest) केली असून आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी न्यायालय 13 ऑक्टोबर रोजी निकाल सुनावणार आहे. याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

संबंधित घटना केरळातील कोल्लम येथे घडली असून आरोपी पतीचं नाव सूरज असं आहे. तर उथरा असं मृत पत्नीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीचं मृत उथराशी लग्न झालं होतं. आरोपी सूरजला लग्नामध्ये भरपूर हुंडा देण्यात आला होता. यामध्ये रोख रक्कम, नवीन कार आणि सोन्याचे दागिने यासह अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. असं असूनही आरोपी समाधानी नव्हता. लग्न झाल्यानंतर काही दिवसात त्याने उथराचा हुंड्यासाठी छळ सुरू केला होता.

हेही वाचा-जळगावात विद्यार्थिनीची आत्महत्या; मोबाईलमधील स्क्रीनशॉटमुळे वाढलं गूढ

दरम्यान, आरोपीनं हुंड्यासाठी अनेकदा पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे. तसेच एकदा आरोपीनं मृत महिलेच्या खोलीत कोब्रा साप सोडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी त्याचा प्लॅन फसला होता. यानंतर त्याने 7 मे 2020 रोजी पत्नी घरात झोपली असताना, दुसऱ्यांदा कोब्रा साप सोडला होता. यादिवशी मात्र उथरा वाचू शकली नाही. कोब्राने दंश केल्यानंतर तिचा  मृत्यू झाला. पण माहेरच्या मंडळींना सूरजवर संशय असल्याने त्यांनी सूरजवर हत्येचा आरोप केला.

हेही वाचा-जास्तीचं भाडं नाकारल्याने उगवला सूड; मुंबईतील तरुणीसोबत उबेर एजंटचं भयंकर कृत्य

या संशयातून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केला असता, त्यांचा भांडाफोड झाला आहे. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच सर्पदंशाने हत्या घडवून आणण्यासाठी त्याने एका गारुड्याकडून साप विकत घेतल्याचं देखील कबुल केलं आहे. याप्रकरणी कोर्टानं आरोपी सूरजला दोषी ठरवलं असून 13 ऑक्टोबर शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हुड्यांसाठी पत्नीने पत्नीचा छळ करून तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

First published:

Tags: Crime news, Kerala, Murder