मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /जास्तीचं भाडं नाकारल्याने उगवला सूड; मुंबईतील तरुणीसोबत उबेर टॅक्सी एजंटचं भयंकर कृत्य

जास्तीचं भाडं नाकारल्याने उगवला सूड; मुंबईतील तरुणीसोबत उबेर टॅक्सी एजंटचं भयंकर कृत्य

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Mumbai: जास्तीचं भाडं दिलं नाही म्हणून मुंबईतील एका उबेर टॅक्सी एजंटने संबंधित तरुणीसोबत भलतंच कृत्य केलं आहे.

मुंबई, 11 सप्टेंबर: जास्तीचं भाडं दिलं नाही म्हणून मुंबईतील एका उबेर टॅक्सी एजंटने संबंधित तरुणीसोबत भलतंच कृत्य केलं आहे. आरोपी उबेर एजंटने पीडित तरुणीला आणि तिच्या नवऱ्याला अश्लील फोटो आणि व्हिडीओज पाठवून शिवीगाळ (sent obscene photos and videos) केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीनं उबेर एजंटविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, आरोपी उबेर एजंट बिहारमध्ये असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी बिहारमधून आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused uber agent arrest) आहेत.

उत्सवकुमार प्रमोद शुक्ला असं अटक करण्यात आलेल्या 18 वर्षीय आरोपीचं नाव आहे. 3 जुलै रोजी पीडित तरुणीनं आपल्या पती आणि सासऱ्यांना बोरिवली याठिकाणी जायचं असल्याने चारच्या सुमारास उबेर टॅक्सी बुक करण्यासाठी एजंट शुक्लाला फोन केला होता. यानंतर आरोपी शुक्लाने सहाच्या सुमारास फोन करून उबेर बुक केल्याचं पीडितेला सांगितलं. संबंधित उबेर टॅक्सीनं पीडितेचे पती आणि सासरे बोरिवलीहून घरी परतत असताना, शुक्लाने पाठवलेल्या चालकानं जास्तीच्या भाड्याची मागणी केली.

हेही वाचा-रोज-रोज सेक्स करण्यासाठी पत्नीचा नकार; भडकलेल्या पतीच्या कृत्याने यवतमाळ हादरलं!

पण तक्रारदार तरुणीच्या पतीनं जास्तीचं भाडं देण्यास नकार दिला आणि दुसऱ्या टॅक्सीने ते घरी परतले. जास्तीचं भाडं देण्यासाठी नकार दिल्याच्या रागातून 4 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास आरोपी शुक्लाने पीडित महिलेच्या मोबाइलवर कॉल करून अश्लील शिवीगाळ केली. आरोपीनं राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय नंबरचा वापर करत पीडित महिलेला व्हॉट्सअॅपद्वारे अश्लील फोटो आणि व्हिडीओज पाठवले.

हेही वाचा-'खास तुझ्यासाठी देवानं मला पाठवलंय', पुजाऱ्याचे विवाहितेवर 6 वर्षे अत्याचार

हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीनं पोलिसांत धाव घेत, आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत, आरोपी शुक्लाचं लोकेशनची माहिती मिळवली. यानंतर पोलिसांनी आरोपीला बिहारमधून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai