मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जळगावात विद्यार्थिनीची आत्महत्या; हातावरील जखमा आणि मोबाईलमधील स्क्रीनशॉटमुळे वाढलं गूढ

जळगावात विद्यार्थिनीची आत्महत्या; हातावरील जखमा आणि मोबाईलमधील स्क्रीनशॉटमुळे वाढलं गूढ

जळगावात बारावीत शिकणाऱ्या एका मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (12th grade female student commits suicide) केली आहे. मोबाइलमध्ये आढळलेल्या स्क्रिनशॉट्समुळे मृत्यूचं गूढ वाढलं आहे.

जळगावात बारावीत शिकणाऱ्या एका मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (12th grade female student commits suicide) केली आहे. मोबाइलमध्ये आढळलेल्या स्क्रिनशॉट्समुळे मृत्यूचं गूढ वाढलं आहे.

जळगावात बारावीत शिकणाऱ्या एका मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (12th grade female student commits suicide) केली आहे. मोबाइलमध्ये आढळलेल्या स्क्रिनशॉट्समुळे मृत्यूचं गूढ वाढलं आहे.

जामनेर, 11 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे एका बारावीत शिकणाऱ्या मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (12th grade female student commits suicide) केली आहे. रविवारी सायंकाळी घरी एकटीच असताना, मुलीनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. मृत मुलीच्या हातावर पबजीच्या स्टेप्सप्रमाणे काही जखमा आढळल्या (Found injury in hands) आहेत. तसेच तिच्या मोबाइलमध्ये पबजी गेमचे काही स्क्रिनशॉट्स देखील आढळले (Found PUB-G game screenshots in mobile) आहेत. त्यामुळे तिने पबजी टास्कद्वारे आत्महत्या केल्याचा दाट संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

नम्रता पद्माकर खोडके असं आत्महत्या करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीचं तरुणीचं नाव असून ती जामनेर येथील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होती. दरम्यान रविवारी सायंकाळी घरी एकटीच असताना, तरुणीनं नगारखान्यातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. मृत नम्रताच्या आईनं हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करत आसपासच्या लोकांना घरी बोलावलं.

हेही वाचा-प्राध्यापकाचा गळा चिरून हाताच्या कापल्या नसा; हत्येच्या घटनेनं औरंगाबाद हादरलं!

शेजारील नागरिकांनी घरी येत दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच तिला खाली उतरवून नागरिकांनी तिला नगारखान्यातील डॉ. के एम जैन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याच रुग्णालयात मृत मुलीचे वडील डॉक्टर म्हणून काम करतात. मुलीनं अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट केलेला पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला.

हेही वाचा-जास्तीचं भाडं नाकारल्याने उगवला सूड; मुंबईतील तरुणीसोबत उबेर एजंटचं भयंकर कृत्य

मृत नम्रताने आत्महत्या करण्यापूर्वी इंग्रजी भाषेतून सुसाइड नोट लिहिली आहे. तसेच आपण वैयक्तिक कारणातून आत्महत्या करत असल्याचं तिने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. परंतु तिच्या हातावर कोपऱ्यापर्यंत काही जखमा पोलिसांना आढळल्या आहेत. तसेच तिच्या मोबाइलमध्ये पबजी गेमचे काही स्क्रिनशॉट्स देखील आढळले आहे. संबंधित मुलीनं पबजी टास्कद्वारे आत्महत्या केली असावी, असा दाट संशय पोलिसांना आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Jalgaon, Suicide