मराठी बातम्या /बातम्या /देश /

Explainer: बलात्काराची तपासणी करण्यासाठी बंदी घातलेल्या टू फिंगर टेस्टचा एअरफोर्सकडून वापर; काय आहे ही पद्धत?

Explainer: बलात्काराची तपासणी करण्यासाठी बंदी घातलेल्या टू फिंगर टेस्टचा एअरफोर्सकडून वापर; काय आहे ही पद्धत?

बलात्काराची तपासणी करण्यासाठी बंदी घातलेल्या टू फिंगर टेस्टचा एअरफोर्सकडून वापर; काय आहे ही पद्धत?
(Image: Air Force School Coimbatore website)

बलात्काराची तपासणी करण्यासाठी बंदी घातलेल्या टू फिंगर टेस्टचा एअरफोर्सकडून वापर; काय आहे ही पद्धत? (Image: Air Force School Coimbatore website)

हवाई दलातल्या महिला अधिकाऱ्यावरच्या बलात्कार प्रकरणामुळे हा मुद्दा चर्चेत आला. त्या प्रकरणातल्या दोषी फ्लाइट लेफ्टनंटला पोलिसांनी अटक केली आहे.

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : एखाद्या महिलेवर, मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची तक्रार आल्यानंतर प्राथमिक पोलीस तपासादरम्यान वैद्यकीय तपासणी (Medical Test) करून, बलात्कार झाला आहे का याची खात्री केली जाते. यासाठी टू फिंगर टेस्ट (Two Finger Test) म्हणजे दोन बोटांची चाचणी ही पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून वापरली जात होती; मात्र 2012-13 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) यावर बंदी घातली. ही पद्धत महिलांसाठी वेदनादायी (Painful) आणि अपमानास्पद असल्यानं, तसंच यामुळे बलात्कार झाल्याचं सिद्ध होत नसल्यानं ही पद्धत वापरू नये असं न्यायालयानं म्हटलं होतं.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही (Central Health Ministry) 2014 मध्ये, ही चाचणी अशास्त्रीय असल्याचं सांगून ती वापरण्यास मनाईचे आदेश जारी केले होते; मात्र नुकतंच एका प्रकरणात भारतीय हवाई दलानं (Indian Air Force) महिला अधिकाऱ्याची (Woman Officer) तपासणी करताना ही पद्धत वापरल्यानं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ही चाचणी म्हणजे काय आणि तिच्याशी संबंधित अन्य मुद्द्यांबद्दल जाणून घेऊ या. 'दैनिक भास्कर'ने याबद्दल विस्तृत माहिती प्रसिद्ध केली आहे.

कोईमतूरमध्ये हवाई दलातल्या एका अधिकारी महिलेनं हवाई दलाच्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह (AirForce Administrative College) कॉलेजच्या परिसरात आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार नुकतीच पोलिसांत दाखल केली. त्या वेळी हवाई दलाच्या अंतर्गत चौकशीदरम्यान हवाई दलाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टू फिंगर टेस्टद्वारे तिची तपसणी केली. आपल्यासाठी ही चाचणी अत्यंत वेदनादायी आणि मानहानीकारक होती, असं या महिला अधिकाऱ्यानं पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

रस्ते अपघातातील जखमीला रुग्णालयात पोहोचवा आणि 5000 रुपये मिळवा, या दिवसापासून सुरू होणार सरकारची ही योजना

या महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानं (National Commission for Women) हवाई दलानं आपल्याच महिला अधिकाऱ्याला दिलेल्या वागणुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, बंदी असूनही अशा चाचणीचा वापर केल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. याबाबत थेट एअर चीफ मार्शलना (Air Chief Marshal) पत्र पाठवून आवाज उठवण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे टू फिंगर टेस्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील (WHO) फार पूर्वीच टू फिंगर टेस्टला अनैतिक म्हटलं आहे. बलात्काराच्या बाबतीत, केवळ हायमेनच्या तपासणीमुळे सगळं स्पष्ट होत नाही. पीडित महिलेला पुन्हा त्याच अनुभवातून जाण्याची वेळ यामुळे येते. ही चाचणी मानवी हक्कांचं उल्लंघन करणारी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. त्यामुळं अनेक देशांमध्ये या चाचणीवर बंदी आहे.

बलात्कार झाला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी टू फिंगर टेस्ट (Two Finger Test) ही चाचणी पूर्वी करण्यात येत असे. ही एक मॅन्युअल प्रक्रिया आहे. यामध्ये डॉक्टर आपल्या हाताची दोन बोटे महिलेच्या गुप्तांगात घालून तपासणी करतात. बोटं सहज आत गेली तर लैंगिक संबंध झाल्याचं मानलं जातं. तसंच हायमेनची स्थिती तपासली जाते. हायमेन फाटलं असेल तर लैंगिक संबंध झाल्याचं गृहीत धरलं जातं; मात्र या चाचणीमुळे महिलेच्या जननेंद्रियाच्या (व्हजायना) स्नायूंचा केवळ लवचिकपणा कळतो. महिलेशी लैंगिक संबंध तिच्या संमतीने झाले की जबरदस्तीने, हे यावरून स्पष्ट होत नाही. त्यामुळे ही चाचणी बंद करावी असा निर्णय न्यायमूर्ती वर्मा समितीनं 2012 साली दिला होता. 16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या एका सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती.

पेट्रोल पंपावरही होतो असा Fraud, फसवणुकीपासून वाचण्यासाठी राहा सतर्क

2013 मध्ये लीलू राजेश विरुद्ध हरियाणा राज्य या खटल्यात बलात्कार पीडितेच्या खासगीपणाचं आणि सन्मानाचं उल्लंघन करणारी ही चाचणी असंवैधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. ही चाचणी शारीरिक आणि मानसिक वेदना देणारी असून, ही चाचणी सकारात्मक आली याचा अर्थ हे संबंध संमतीने बनले आहेत असा होत नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.

बलात्कार प्रकरणात महिला किंवा मुलीचा लैंगिक इतिहास महत्त्वाचा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं वारंवार सांगितलं आहे. इथे फक्त संमतीचा विषय आहे. कोणत्या स्थितीत आणि कोणत्या स्तरावर संमती देण्यात आली, ते पाहणंही महत्त्वाचं ठरतं. टू फिंगर टेस्ट चाचणीवर आधारित निष्कर्ष काल्पनिक आणि वैयक्तिक मत असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे; मात्र आजही ही चाचणी होत आहे. 2019 मध्ये तब्बल 1500 बलात्कार पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या चाचणीला सामोरं जावं लागत असल्याची तक्रार करून, ही चाचणी करणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती.

एका लग्नाची गोष्ट! तरुणाचं एकाच वेळी दोन तरुणींसोबत लग्न, तिघांच्याही मुलांनी केली धमाल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही ही चाचणी अवैज्ञानिक असल्याचं सांगून मार्च 2014 मध्ये बलात्कार पीडितांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वं तयार केली आहेत. यामध्ये पीडितेच्या शारीरिक तपासणीसाठी ही चाचणी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ‘फॉरेन्सिक मेडिसीन अँड टॉक्सिकॉलॉजी’च्या अभ्यासक्रमातला ‘कौमार्याची लक्षणं’ हा विषय काढून टाकला आहे.

दरम्यान, हवाई दलातल्या महिला अधिकाऱ्यावरच्या बलात्कार प्रकरणामुळे हा मुद्दा चर्चेत आला. त्या प्रकरणातल्या दोषी फ्लाइट लेफ्टनंटला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे या मुद्द्यावर आवाज उठवला गेल्यानं ही चाचणी बंद होण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Rape