मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Oh no! उत्साहात मिठी मारणं पडलं महागात; कपलसोबत काय घडलं पाहा Video

Oh no! उत्साहात मिठी मारणं पडलं महागात; कपलसोबत काय घडलं पाहा Video

कपल मिठी मारायला गेलं आणि...

कपल मिठी मारायला गेलं आणि...

कपल मिठी मारायला गेलं आणि...

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 05 ऑक्टोबर : आपण खूप दिवसांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटलो (Hug) की आपला आनंद गगनात मावत नाही. तो उत्साहच वेगळा असतो. त्यावेळी एकमेकांना कडकडून मिठी (Hugging) मारल्याशिवाय राहवतच नाही. असंच खूप दिवसांनी भेटलेलं एक कपल एकमेकांना मिठी (Couple hugging video) मारायला गेलं. पण हे कपल जमिनीवर धाडकन कोसळलं आहे.

या कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सुरुवातीला धक्का बसेल. पण हसूही आवरणार नाही. त्यानंतर पुढे जे कपलने केलं ते पाहून तर या कपलची नजर काढावी असंच वाटेल.

व्हिडीओत पाहू शकता एक तरुणी एका गाडीतून येते. आपला जोडीदार तिथं पोहोचलेला आहे याची तिला माहिती होते. त्यामुळे गाडीतूनच घाईघाईत बाहेर पडते आणि पळतच आपल्या जोडीदाराकडे जाते.

हे वाचा - 'लग्नानंतर तू...', बोहल्यावर चढण्याआधी मित्राने दिला जोर का झटका; नवरदेव हादरला

दोघांनाही इतका आनंद झाला आहे, इतका उत्साह आहे की ते पळत पळत मिठी मारायला जातात. पण मिठी कसली दोघंही धाडकन जमिनीवर कोसळतात आणि तोंडावर आपटतात. त्यानंतर त्यांना उठायलाही जमत नसतं. त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक कसंबसं करून त्यांना उठवतात.

कपल इतक्या जोरात जमिनीवर आदळतं, त्यावरून त्यांना किती वेदना झाल्या असतील याची कल्पना आपल्याला आलीच असेल. पण तरी त्या वेदना या कपलला मात्र बिलकुल जाणवत नाही आहेत. कारण त्यांच्या वेदनेपेक्षा त्यांना भेटीचा आनंद जास्त आहे. त्यामुळेच जेव्हा ते पुन्हा उभे राहतात. तेव्हा आपल्याला कुठे लागलं आहे का हे पाहत नाही तर एकमेकांच्या मिठीत जातात.

First published:

Tags: Couple, Viral, Viral videos