मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नारायण राणेंनी रोवला वेंगुर्ला पालिकेत भाजपचा झेंडा, महाविकास आघाडीला धोबीपछाड

नारायण राणेंनी रोवला वेंगुर्ला पालिकेत भाजपचा झेंडा, महाविकास आघाडीला धोबीपछाड

 नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.  त्यामुळे नगरपालिकेची राजकीय समीकरणे बदलली होती.

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नगरपालिकेची राजकीय समीकरणे बदलली होती.

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नगरपालिकेची राजकीय समीकरणे बदलली होती.

  • Published by:  sachin Salve

वेंगुर्ला, 05 ऑक्टोबर : वेंगुर्ला नगरपालिकेच्या (Vengurla Municipal Corporation) उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने (bjp) काँग्रेस (congress), राष्ट्रवादी (ncp), शिवसेना (shivsena ) आघाडीला धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवार शितल आंगचेकर (shital aagchekar) यांनी  काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगरसेवक विधाता सावंत (vidhata sawant) यांचा 10 विरुद्ध 7 अशा मताने दणदणीत पराभव केला आहे.  तळकोकणातील वेंगुर्ला नगरपालिकेवर पुन्हा एकदा नारायण राणे (narayan rane) यांनी आपला भाजपचा झेंडा रोवत विरोधकांना धूळ चारली आहे. यात वेंगुर्ल्याचे काँगेस पक्षाचे निष्ठावंत व तगडे नेते विलास गावडे यांना फार मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते विलास गावडे यांचे कट्टर समर्थक असलेले नगरसेवक विधाता सावंत यांना पक्षाने उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरले होते. यासाठी काँग्रेस पक्षाकडून गटनेते प्रकाश डिचोलकर यांनी व्हीप जारी केला होता. मात्र, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या व सध्या भाजपमध्ये असलेल्या काही नगरसेवकांनी या व्हिपला केराची टोपली दाखवली.

विलास गावडे यांना मानणारा मोठा वर्ग वेंगुर्ला भागात आहे. हा भाग विलास गावडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, याच बालेकिल्ल्यात विलास गावडे यांना चारीमुंड्या चीत करण्याची किमया पुन्हा एकदा भाजपने केली आहे. त्यामुळे काँग्रेसला बसलेला हा धक्का आगामी काळात काँग्रेस कशापद्धतीने पचवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Indian Oil Recruitment: इंडियन ऑइलमध्ये जुनिअर इंजिनिअर्सच्या 513 जागांसाठी भरती

विधाता सावंत हे विलास गावडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे विधाता यांचा हा आजचा पराभव विलास गावडे यांना निश्चितच जिव्हारी लागणार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष राजन गिरप हे थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून गेले होते. तर युती असल्याने केवळ एक नगरसेवक असूनही शिवसेनेला भाजपने उपनगराध्यक्षपद दिले होते. काँग्रेसच्या तिकिटावर काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आले होते.

मात्र, नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.  त्यामुळे नगरपालिकेची राजकीय समीकरणे बदलली होती. अपक्ष म्हणून निवडून आलेले तुषार सापळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मात्र आजच्या उपनगराध्यक्ष च्या निवडणुकीत तुषार सापळे  तटस्थ राहिले.  त्यामुळे हा एक शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो.

दारुड्यानं चोरला कोंबडा! म्हणाला, कापून खाल्ला आता काय करू?

वेंगुर्ला नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. अवघे दोन महिने निवडणुकीसाठी शिल्लक आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सहित भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र काँग्रेस पक्षाने बजावलेला व्हिप आणि काँग्रेस पक्षावर निवडून येऊन भाजपच्या गोटात जाणाऱ्या नगरसेवकांनीही नाकारल्याने येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप ही राजकीय लढाई वेंगुर्ला वासियांना पाहायला मिळणार आहे.

मात्र निश्चितच हा पराभव काँग्रेसचे तगडे नेते विलास गावडे यांना जिव्हारी लागणारा असून आत्मचिंतन करायला लावणारा आहे. दोन महिन्यावर येणार्‍या आगामी वेंगुर्ला नगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास गावडे या पराभवातून काय बोध घेतात? आणि नवीन काय रणनिती आखतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

First published:

Tags: Shivsena, नारायण राणे