नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : देशात युपीएससीच्या विद्यार्थ्यांचे निकाल हाती येत असून कित्येक विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळत आहे. अशात केरळमध्ये लोकसेवा आयोगाची परिक्षा पास झालेल्या दोघांची ही घटना आहे. केरळमध्ये, मलप्पुरममधील 42 वर्षीय आई (बिंदू) आणि तिचा 24 वर्षीय मुलगा (विवेक) यांनी मिळून लोकसेवा आयोग (पीएससी) परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे.
दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही एकत्र कोचिंग क्लासला जायचो. माझ्या आईने मला या पदापर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घेतली. तर माझ्या वडिलांनी आमच्यासाठी सर्व सोयीसुविधांची व्यवस्था केली. आम्हाला आमच्या शिक्षकांकडून खूप प्रेरणा मिळाली. आम्ही दोघे एकत्र शिकलो पण आम्ही एकत्र पात्र होऊ असे कधीच वाटले नव्हते. आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत, 24 वर्षीय विवेकने ही माहिती सांगितली.
हे ही वाचा : मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातीही ठरली! फडणवीसांकडे दोन 'जम्बो' मंत्रिपदं?
काही लोकांनी तुम्ही वयाच्या 42 व्या वर्षी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कशी देऊ शकला, असा प्रश्न विचारला याबाबत बिंदु म्हणाल्या कि, केरळमध्ये सुरू नसलेल्या, स्ट्रीम-2 पदांसाठी कमाल वय 40 आहे. याचबरोबर ओबीसी प्रवर्गात तीन वर्षे, एससी आणि एसटी आणि विधवांसाठी पाच वर्षे सूट आहे. दिव्यांग (भाषण, श्रवण आणि दृष्टी) साठी 15 वर्षांसाठी सवलत आहे तर अस्थिव्यंगासाठी 10 वर्षे आहे. यामध्ये मला एकाचा फायदा झाल्याने मी या पदापर्यंत येऊ शकल्याची माहिती बिंदु यांनी दिली.
Kerala | A 42-year-old mother and her 24 years old son from Malappuram have cleared Public Service Commission (PSC) examination together pic.twitter.com/BlBKYJiDHh
— ANI (@ANI) August 10, 2022
मसूरी-आधारित लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) ही नागरी सेवकांसाठी देशातील प्रमुख प्रशिक्षण संस्था आहे. मागच्या सहामहिन्यात विविध पदांच्या भरतीसाठी मागणी करण्यात आली असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
हे ही वाचा : 'मिशन 2024'च्या रेसमध्ये शरद पवार पडले मागे? काँग्रेसची नितीश कुमारांना मोठी ऑफर!
लोकसेवा आयोग (UPSC) दरवर्षी IAS आणि IPS श्रेणीत थेट भरतीच्या आधारावर रिक्त पदे भरण्यासाठी नागरी सेवा परीक्षा आयोजित करते. IPS अधिकार्यांच्या संदर्भात, CSE-2020 वरून CSE द्वारे IPS चे प्रमाण 200 पर्यंत वाढवण्यात आले आहे, असे मंत्री म्हणाले. पुढे, पदोन्नती कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी, निवड समितीच्या बैठका यूपीएससीद्वारे राज्य सरकारांसोबत घेतल्या जातात, असेही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.