मुंबई, 9 ऑगस्ट : सत्ता स्थापन केल्यानंतर 39 दिवसांनी महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला आहे. राजभवनात झालेल्या या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या (BJP) 9 तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या 9 आमदारांनी शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता कोणाला कोणतं खातं मिळणार? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. कोणाला कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी आता समोर आली आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली असली तरी याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे स्वत:कडे नगरविकास खातं ठेवतील तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृह आणि अर्थ ही दोन मोठी खाती असू शकतात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना महसूल तसंच सार्वजनिक बांधकाम तर सुधीर मुनगंटीवार यांना उर्जा आणि वन खातं मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा, दादा भुसे यांना कृषी, संजय राठोड यांना ग्राम विकास खाती दिली जाऊ शकतात. महाविकासआघाडी सरकारमध्ये पर्यटन आणि पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंचं खातं दीपक केसरकर यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. सुभाष देसाई यांचं उद्योग खातं उदय सामंत यांना दिलं जाऊ शकतं. संभाव्य खातेवाटप एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ राधाकृष्ण विखे पाटील - सहकार सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन चंद्रकांतदादा पाटील - महसूल, सार्वजनिक बांधकाम विजय कुमार गावित- आदिवासी विकास गिरीश महाजन - जलसंपदा गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा दादा भुसे- कृषी संजय राठोड- ग्राम विकास सुरेश खाडे - सामाजिक न्याय संदीपान भुंभरे- रोजगार हमी उदय सामंत - उद्योग तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री रवींद्र चव्हाण- गृह निर्माण अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण अतुल सावे - आरोग्य शंभूराज देसाई- उत्पादन शुल्क मंगलप्रभात लोढा- विधी न्याय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.