नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: सत्ताधारी शिवसेनेविरोधात उघडपणे पंगा घेणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहे. कंगनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Kangana Ranaut Meet Yogi Adityanath) यांची भेट घेतली. यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर (Kangana Ranaut becomes ODOP ambassador) म्हणून घोषीत करण्यात आले आहे. कंगनाने शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला ODOP ची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून घोषित करण्यात आले.
Famous Actress Kangana Ranawat met @myogiadityanath Hon’ble Chief Minister UP, who presented her with an @UP_ODOP product. Kangna ji will be our Brand Ambassador for ODOP @CMOfficeUP pic.twitter.com/XUJTiStRqv
— Navneet Sehgal (@navneetsehgal3) October 1, 2021
हे वाचा- HBD: जर्नालिस्टचं स्वप्न पाहणारी मुलगी बनली प्रसिद्ध अभिनेत्री; हिना खानचा….. इतकेच नव्हे तर या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला एक विशेष वस्तू भेट म्हणून दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेले नाणं त्यांनी कंगनाला दिले आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसेच, हा शुभशकुन असल्याचेदेखील म्हटले आहे.
काय आहे ODOP मोहीम? यूपी सरकारने राज्यातील 75 जिल्ह्यांमध्ये उत्पादन-विशिष्ट पारंपारिक औद्योगिक केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. ODOP अर्थात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या मोहिमेसाठी कंगनाची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये उत्तर प्रदेशमधील स्थानिक कारागिरीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे वाचा- Bigg Boss 15: घरात एन्ट्रीच्या आधी तेजस्वीने शेअर केला VIDEO; तर प्रतीक सहेजपालन प्रत्येक जिल्ह्याची विशेष हस्तकला किंवा कारागिरी त्या जिल्ह्याची विशेषता म्हणून लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.उत्तर प्रदे मधील जिल्ह्यांमध्ये तयार होणाऱ्या चिकनकारी, झारी झरदोझी, काला नमक राईस अशा अनेक गोष्टी इतर कुठेही होत नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. कंगनाच्या वर्कफ्रटंबद्दल बोलायचे झाले तर…. नुकतंच कंगनाने प्रमुख भूमिका साकारलेला थलैवी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात कंगना, जयललिता यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी हा प्रवास अनुभवायला मिळणार आहे.