• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss 15: घरात एन्ट्रीच्या आधी तेजस्वीने शेअर केला VIDEO; तर प्रतीक सहेजपालने चाहत्यांना केलं खास आवाहन

Bigg Boss 15: घरात एन्ट्रीच्या आधी तेजस्वीने शेअर केला VIDEO; तर प्रतीक सहेजपालने चाहत्यांना केलं खास आवाहन

सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेला 'बिग बॉस' चा १५ वा सिझन आज सुरु होत आहे. त्यामुळे काही तासांतचं रसिक प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑक्टोबर- टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय रिएलिटी शो 'बिग बॉस १५' (Bigg Boss 15) चा आज धमाकेदार प्रीमियर होणार आहे. चाहते अगदी उत्सुकतेने बिग बॉस १५ ची वाट पाहात होते. मात्र आज या सर्वांची प्रतीक्षा संपणार आहे. आज सर्वांचे लाडके स्पर्धक बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. घरात प्रवेश करत असताना या सर्व स्पर्धकांचा आपल्या कुटुंबाशी, मित्रांशी एकंदरीत बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. त्यांचे मोबाईल ऑफ केले जातात. त्यामुळे घरात जायच्या आधी हे कलाकार आपल्या हटके अंदाजात आपल्या कुटुंबाला आणि चाहत्यांचा निरोप घेत आहेत.
  अभिनेत्री तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash) बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे हे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झालं आहे. मात्र ती स्वतः या गोष्टीचा खुलासा कधी करते याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र नुकताच तेजस्वी प्रकाशने इन डायरेक्ट या गोष्टीचा खुलासा केला आहे. तेजस्वी प्रकाशने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या साहित्याचं सुटकेस घेऊन घराच्या बाहेर पडली आहे आणि 'बंटी और बबली' चित्रपटातील 'हम चले हम चले' गाण्यावर धम्माल डान्स करत आहे. तसेच तेजसवणे कॅप्शन लिहीत म्हटलं आहे, 'ओळखा मी कुठे जाण्यासाठी निघालेय'. असं म्हणत तेजस्वीने बिग बॉसची तयारी सुरु केली आहे.
  तर दुसरीकडे बिग बॉस OTT फेम प्रतीक सहेजपालनेसुद्धा(Pratik Sahejpal) इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या बिग बॉस १५ च्या घरातील एन्ट्रीचा खुलासा केला आहे. प्रतीकने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, 'चला निघतो, चूकभूल सगळं माफ करा, जे आहे मनापासून आहे फक्त इतकंच म्हणू शकतो. मी खूप कष्टाने, खऱ्या मनाने इथपर्यंत पोहोचलो आहे. नियत स्वच्छ, मन स्वच्छ आणि खूप जास्त प्रेम घेऊन मी आलो आहे. माझी आई, बहीण, मित्र आणि माझ्या चाहत्यांसाठी माझे प्राण हजर आहेत. मी आत फाडून टाकतो तुम्ही बाहेर फाडून टाका. #BB १५ असं म्हणत प्रतीकने सर्वांचा निरोप घेतला आहे. ( हे वाचा:Bigg Boss15: 'उडान' फेम 'इमली'ची होणार बिग बॉसमध्ये एन्ट्री; जाणून घ्या ... ) सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेला 'बिग बॉस' चा १५ वा सिझन आज सुरु होत आहे. त्यामुळे काही तासांतचं रसिक प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात जंगल थीम असणार आहे हे आधीच स्पष्ट झालं आहे. मात्र यामध्ये आणखी कोणते ट्विस्ट असणार आहेत हे पाहणं रंजक ठरणार आहे. सलमान खान आज प्रीमियरद्वारे स्पर्धकांना शोमध्ये एन्ट्री देणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: