मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: जर्नालिस्टचं स्वप्न पाहणारी मुलगी बनली प्रसिद्ध अभिनेत्री; वाचा हिना खानचा अनोखा प्रवास

HBD: जर्नालिस्टचं स्वप्न पाहणारी मुलगी बनली प्रसिद्ध अभिनेत्री; वाचा हिना खानचा अनोखा प्रवास

अभिनेत्री हिना खानचा जन्म २ ऑक्टोबर १९८६ मध्ये श्रीनगर, जम्मू काश्मिरमध्ये झाला होता. हिना खानला जर्नालिस्ट बनायचं होतं.

अभिनेत्री हिना खानचा जन्म २ ऑक्टोबर १९८६ मध्ये श्रीनगर, जम्मू काश्मिरमध्ये झाला होता. हिना खानला जर्नालिस्ट बनायचं होतं.

अभिनेत्री हिना खानचा जन्म २ ऑक्टोबर १९८६ मध्ये श्रीनगर, जम्मू काश्मिरमध्ये झाला होता. हिना खानला जर्नालिस्ट बनायचं होतं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 2ऑक्टोबर- छोट्या पडद्यावरील(Tv Actress) अत्यंत लोकप्रिय आणि टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून हिना खानला (Hina Khan) ओळखलं जातं. हिनाने अत्यंत कमी वयात आपल्या करिअरची सुरुवात करत मोठं यश मिळवलं आहे. आज हि पडद्यावरील लाडकी सून आपला ३४ वा वाढदिवस(34 Th Birthday Today) साजरा करत आहे. ती अशा कलाकारांपैकी एक आहे जिला अभिनेत्री बनायचं नव्हतं. मात्र नशिबाने काही वेगळंच ठरवून ठेवलं होतं.

अभिनेत्री हिना खानचा जन्म २ ऑक्टोबर १९८६ मध्ये श्रीनगर, जम्मू काश्मिरमध्ये झाला होता. हिना खानला जर्नालिस्ट बनायचं होतं. त्यासाठी ती श्रीनगरहून दिल्लीला आली होती. मात्र इथे आल्यांनतर तिने आपला विचार बदलला. आणि एमबीए केलं. त्यांनतर हिनाने एअरहोस्टेस बनायचं ठरवलं. म्हणून ती मुंबईला आली. त्यासाठी तिने अर्जसुद्धा केला होता. मात्र त्यावेळी तिला मलेरिया झाला होता. म्हणून ती त्यामध्ये सहभागी झाली नाही. आणि तिच्या नशिबाने तिच्यासाठी आधीच काही तरी ठरवून ठेवलं होतं. त्यामुळेच ती इतक्या सर्व गोष्टींचा विचार करत असताना नकळत एक अभिनेत्री बनली. आणि पहिल्याच मालिकेने तिला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. असं फारच कमी लोकांसोबत होतं त्यातीलच हिना खान ही एक आहे.

(हे वाचा:ठरलं! Mouni Roy लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत'; बॉयफ्रेंडसोबत या ठिकाणी करणार....)

असं झालं अभिनयात पदार्पण-

'ए रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेसाठी ऑडिशन घेण्यात येत होतं. हिना आपल्या मैत्रिणींसोबत त्या सेटवर पोहोचली होती. तिलाअभिनयात रुची नव्हती. ती अभिनयाबद्दल अजिबात गंभीर नव्हती. मात्र सुदैवाने हिनाचं या ऑडिशनमध्ये सिलेक्शन झालं. आणि अशाप्रकारे तिच्या यशाचा प्रवास सुरु झाला. २००९ मध्ये हिना खान 'ए रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून ती आपल्या भेटीला आली होती. या पाहिल्याचं मालिकेतून ती घराघरात पोहोचली. अक्षरा या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. हि मालिका छोट्यापडद्यावरील सर्वात जास्त वर्षे चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. काही वर्षानंतर मालिकेत बदल होत गेले आणि हिनाने ही मालिका सोडली. त्यांनतर ती अनेक शोमध्ये दिसून आली. या मालिकेतून नैतिक आणि अक्षरा ही जोडी चाहत्यांना फारच पसंत पडली होती. अभिनेता करण मेहरा या मालिकेत नैतिकच्या भूमिकेत होता.

(हे वाचा:Bigg Boss15: 'उडान' फेम 'इमली'ची बिग बॉसमध्ये एन्ट्री; कोण आहे अभिनेत्री?)

हिना खान या मालिकेत अत्यंत साध्या सरळ सुनेच्या भूमिकेत होती. अनेक वर्ष या मालिकेत काम केल्यामुळे तिची प्रतिमा तशीच बनली होती. मात्र मालिका सोडल्या नंतर या अभिनेत्रीने आपला ग्लॅमरस अंदाज सर्वांना दाखवला. या अभिनेत्रीने आपली टिपिकल संस्कारी सून ही प्रतिमा खोडून काढली. आणि आपण प्रत्येक रोलसाठी कसे तयार आहोत हे दाखवून दिलं. तसेच तिने खतरों के खिलाडी, बिग बॉससारख्या रिएलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. इतकंच नव्हे तर बिग बॉसमध्ये ती रनरअप ठरली होती. सध्या हिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सतत ती आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते.

First published:

Tags: Entertainment, Tv actress