Home /News /national /

धक्कादायक! काबुल एअरपोर्ट स्फोटाचं India Connection आलं पुढे; ISIS-K दहशतवादी गटामध्ये 14 केरळी नागरिक सामील

धक्कादायक! काबुल एअरपोर्ट स्फोटाचं India Connection आलं पुढे; ISIS-K दहशतवादी गटामध्ये 14 केरळी नागरिक सामील

तालिबानने सुटका केलेले दहशतवादी आणि बंडखोरांमध्ये केरळच्या 14 नागरिकांचा समावेश होता. काबुल स्फोटामागे असलेल्या ISIS-K दहशतवादी गटात सामील व्हायला ते काही वर्षांपूर्वी केरळमधून गेले होते.

काबुल, 28 ऑगस्ट: काबूल विमानतळावर (Kabul Airport Blast) नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रॉव्हिन्स (Islamic State of Khorasan Province - ISIS-K) या दहशतवादी गटामध्ये (Terror Group) केरळमधल्या (Keralites in ISIS_K) 14 जणांचा सहभाग असल्याचं समोर येत आहे. अमेरिकेच्या 13 सैनिकांसह 170 जणांचे प्राण या बॉम्बस्फोटात गेले आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, बागराम तुरुंगातून (Bagaram Jail) तालिबानने सुटका केलेले दहशतवादी आणि बंडखोरांमध्ये केरळच्या 14 नागरिकांचा समावेश होता. 26 ऑगस्ट रोजी काबूलमधल्या तुर्कमेनिस्तानच्या दूतावासाबाहेर इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसचा (Improvised Explosive Device - IED) स्फोट घडवून आणण्याच्या प्रयत्नात दोन पाकिस्तानी नागरिकांना सुन्नी पश्तून दहशतवादी गटाने ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे; मात्र याबद्दल अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. गुप्तचर संस्थेच्या माहितीतून असे संकेत मिळत आहेत, की काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटानंतर लगेचच दोन पाकिस्तानी नागरिकांकडून IED जप्त करण्यात आली. काबूल स्फोटाचं अमेरिकेनं दिलं प्रत्युत्तर; अफगाणिस्तानात ISIS वर ड्रोन हल्ला यात सहभागी असलेल्या केरळच्या एका नागरिकाने त्याच्या घरी संपर्क साधला होता, तर अन्य 13 जण ISIS-K दहशतवादी गटासोबत अद्याप काबूलमध्येच आहेत, असं समजतं. 2014 साली सीरिया आणि लेव्हंटने उत्तर इराकमधल्या मोसूल (Mosul) शहरावर कब्जा केला, तेव्हा केरळमधल्या मलप्पुरम, कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यातल्या काही नागरिकांनी भारतातून निघून पश्चिम आशियातल्या जिहादी गटात (Jihadist Group) प्रवेश केला. त्यातली काही केरळी मंडळी अफगाणिस्तानातल्या नानगरहर प्रांतात (Nangarhar Province) आली. या केरळी नागरिकांचा वापर करून अफगाणिस्तानातल्या दहशतवादाशी भारताचा संबंध जोडून तालिबान भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करील, अशी चिंता भारत सरकारला वाटत आहे. काबूल विमानतळामध्ये घुसले तालिबानी; पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता अफगाणिस्तानच्या राजधानीचं शहर असलेल्या काबूलमधली परिस्थिती अद्याप अस्थिरच आहे. हक्कानी नेटवर्कच्या पाठिंब्याने पाकिस्तान तालिबानला 12 सदस्यांचं मंत्रिमंडळ स्थापन करण्याची जबरदस्ती करत आहे. अन्य देशांकडून कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी या मंत्रिमंडळात आधीच्या सरकारमधले काही चेहरे हवेत, असंही पाकिस्तानचं म्हणणं आहे. दरम्यान, तालिबानशी नेमके कसे संबंध ठेवायचे, याबद्दल अंतिम निर्णय घेण्याआधी अमेरिका आणि नाटोच्या सैन्याच्या फौजा अफगाणिस्तानातून पूर्णपणे कधी बाहेर निघतात, याची अफगाणिस्तानचे शेजारी देश वाट पाहत आहेत. त्यामुळे भारतासह अन्य देशही सध्या 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. 15 ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा केला. त्यानंतर त्यांनी आपल्या पूर्वीच्या प्रतिमेला छेद देत सर्वांना शांतता राखण्याचं आणि आपण हिंसाचार करणार नसल्याचं सांगितलं. दरम्यान, त्यानंतर काहीच दिवसांत ISIS-K ने काबूल विमानतळावर स्फोट घडवून आणला.
First published:

Tags: Afghanistan, ISIS, Kabul, Kerala

पुढील बातम्या