मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

BREAKING : काबूल विमानतळावरील स्फोटाचं अमेरिकेनं दिलं प्रत्युत्तर; अफगाणिस्तानात ISIS वर ड्रोन हल्ला

BREAKING : काबूल विमानतळावरील स्फोटाचं अमेरिकेनं दिलं प्रत्युत्तर; अफगाणिस्तानात ISIS वर ड्रोन हल्ला

अमेरिकेनं काबूल विमानतळावरील हल्ल्याचं सडेतोड उत्तर देत पूर्व अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला (US carried out drone strike against Islamic State) केला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

काबूल 28 ऑगस्ट : बुधवारी काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट झाले (Kabul Airport Blast) होते. यात 13 अमेरिकेच्या सैनिकांसह 170 लोक मारले गेले होते. . या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंसनं (IS-KP) घेतली होती. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते, की अमेरिका आपल्या शत्रूंना शोधून मारेल. यानंतर 48 तासातच अमेरिकेनं दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे. आता अमेरिकेनं या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देत पूर्व अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला (US carried out drone strike against Islamic State) केला आहे. पेंटागननं याबद्दलची माहिती दिली आहे. ठरवलेलं टार्गेट उद्धवस्त केल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.

न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, सैन्यानं हा हल्ला नानगहर प्रांतात केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं अमेरिकेच्या नागरिकांना विमानतळाच्या वेगवेगळ्या गेट्समधून तात्काळ बाहेर काढण्यास सांगण्यात आलं आहे. यूएस सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं, की अमेरिकी सैन्याच्या जवानांनी एका ISIS-K प्लॅनरच्या विरोधात दहशतवादविरोधी अभियान चालवलं जात आहे. इस्लामिक स्टेट खुरासननं काबूल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. मात्र, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यानं आयएसचं किती नुकसान झालं याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन सासाकी यांनी अशी भीती व्यक्त केली आहे, की काबूलमध्ये आणखी स्फोट होऊ शकतात. दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेनं काबूल विमानतळावरील सुरक्षा वाढवली आहे.

First published:

Tags: Afghanistan, America, Attack